Shasan Aaplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण

Government Scheme : शासनाशी संबंधित अनेक बाबींसाठी सर्वसामान्यांच्या गरजा निगडीत असतात. यात शासनाच्या विविध विभागांकडून मिळणारी प्रमाणपत्रे ही शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असतात.
Mantralay
Mantralay Agrowon

Nanded News : शासनाशी संबंधित अनेक बाबींसाठी सर्वसामान्यांच्या गरजा निगडीत असतात. यात शासनाच्या विविध विभागांकडून मिळणारी प्रमाणपत्रे ही शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असतात.

ही कागदपत्रे मिळवताना नागरिकांची दमछाक होऊ नये, विनासायास त्यांना त्यांची हक्काची प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळावेत यादृष्टीने आता जनतेला शासनाच्या दारात नाही तर शासन जनतेच्या दारात पोहचत आहे, ही या अभिनव योजनेची फलनिष्पत्ती असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

हदगाव तालुक्यातील पिंपळगाव सर्कल येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमात ते बोलत होते.

यावेळी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सरपंच आडे, तहसीलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी आडेराव, बाबूराव कदम, भागवत देवसकर आणि एकात्मिक बालविकास, आरोग्य, महावितरण, मंडळअधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mantralay
Shashan Apali Dari : 'शासन आपल्या दारी'चा कोल्हापुरात सोहळा

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये शासनाने जनसेवेसाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत ही भावना शासन आपल्या दारी अभियानातून प्रभावीपणे रुजली जात असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक करावे लागेल.

या शब्दात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी गौरव केला. या अभियानात कृषी, महसूल, सीडीपीओ व इतर विभागासंदर्भात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

या लाभार्थ्यांमध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य तपासणी, स्तनदा माता यांना पोषण आहार, कृषी विभागामार्फत प्रात्यक्षिकासाठी व इतर उद्देशाने बियाणांचे वाटप, शासकीय याेजनेतून ट्रॅक्टर ज्यांना मिळाले असा लाभाधारकांशी संवाद आदी उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांच्या पात्रताधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप लगेच करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com