Pune International Business Summit 2024 : ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’मध्ये अन्नप्रक्रियेवर चर्चा

Opportunities in Food Processing Sector : ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट २०२४’ मध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संधींबाबत चर्चा होणार आहे.
Pune International Business Summit 2024
Pune International Business Summit 2024 Agrowon

Pune News : जगातील १२ देशांमधील वाणिज्यदूतांशी थेट संवादाची संधी मिळवून देणाऱ्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट २०२४’ मध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संधींबाबत चर्चा होणार आहे.‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) या पाचव्या शिखर परिषदेचे आयोजन पुण्यातील एका हॉटेलमध्ये येत्या सोमवारी व मंगळवारी (ता. २६, २७) केले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल दूरदृश्‍यप्रणालीद्वारे परिषदेला मार्गदर्शन करतील.

‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर म्हणाले, ‘‘राज्यातील उद्योग, कृषी, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील २५० छोटे व मध्यम उद्योजक परिषदेत सहभागी होतील. या परिषदेमुळे निर्यातवाढ, राज्यात गुंतवणुकीला चालना मिळेल. पुण्याभोवतीच्या जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीची साखळी भक्कम करणे, व्यापारात छोट्या-मध्यम उद्योजकांना, महिलांना, स्टार्टअप्सला नव्या संधी मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे.’’

Pune International Business Summit 2024
Food Processing : नांदेडला बँकांकडून तब्बल ४४९ प्रस्ताव रद्द

महासंचालक प्रशांत गिरबाने म्हणाले, ‘‘अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अडीचशे कंपन्या पुण्याच्या आसपास आहेत. देशाचे एकूण सकल उत्पादन वाढत असताना वेष्टित व प्रक्रियायुक्त अशा दोन्ही श्रेणीतील अन्न पदार्थांना मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नव्या संधीचा शोध घेण्याचा प्रयत्न परिषदेत केला जाईल. त्यासाठी प्रवीण मसालेवाले उद्योग समूहाचे संचालक आनंद चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेत चर्चा घडवून आणली जाईल.’’

Pune International Business Summit 2024
PM Food Processing Industry Scheme : पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘केव्हीके’मध्ये प्रशिक्षण

देशातील प्रख्यात उद्योगपती आपल्या यशाचे गमक या परिषदेत उलगडून सांगतील. यात बाबा कल्याणी (भारत फोर्ज), रवी पंडित (केपीआयटी टेक्नॉलॉजिज), नौशाद फोर्ब्ज (फोर्ब्ज मार्शल), प्रदीप भार्गव (एमईसीएफ), अरविंद गोयल (टाटा अॅटोकॉम्प), आनंद देशपांडे (पर्सिस्टन्ट सिस्टिम्स) यांचा समावेश आहे.

परिषदेत सहभागासाठी https://mcciapune.com/events/events-detail-page/1791/ या संकेतस्थळावर माहिती मिळू शकेल, असे संयोजकांनी स्पष्ट केले.

सायबर सिक्युरिटी सेंटर होणार

राज्यातील उद्योग व कंपन्यांना सायबर हल्ल्याचा धोका सतत जाणवतो आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा कवच तसेच या क्षेत्रातील कौशल्यविकास सुविधा देण्यासाठी मराठा चेंबरने ‘सेंटर एक्सलन्स फॉर सायबर सिक्युरिटी’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अमेरिका व इस्राईलमधील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. सहा कंपन्यांकडे या केंद्राची जबाबदारी असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com