Agriculture Policy : कृषी क्षेत्राशी संबंधित मुलभूत धोरणांवर चर्चा

Bhartiya Kisan Sangh : भारतीय किसान संघाच्या दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित मुलभूत चिंतन व धोरणे यावर चर्चा करण्यात आली.
Urban Agriculture Policy
Urban Agriculture PolicyAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : भारतीय किसान संघाच्या दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित मुलभूत चिंतन व धोरणे यावर चर्चा करण्यात आली. वेरूळ येथील टांका आश्रम येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी हा वर्ग पार पडला. या अभ्यास वर्गानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Urban Agriculture Policy
Agriculture Policy : योजना नको, कायदा हवा

या अभ्यास वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष पंडितराव वारंगे, प्रांत अध्यक्ष बाबुराव देशमुख, महामंत्री कैलाजी ढोले, मदनराव देशपांडे, क्षेत्र संघटन मंत्री दादा लाड, प्रांत संघटन मंत्री चंदनजी पाटील तसेच अखिल भारतीय उपाध्यक्ष कपिलाताई मुठे यांची उपस्थिती होती.

अग्रोवन

Urban Agriculture Policy
Agriculture Policy : सत्तासुंदरी अन् पुतनामावशीचे प्रेम

प्रदेश कार्यकारिणीची निवड

या अभ्यास वर्गाच्या निमित्ताने प्रदेश कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी मुगुटराव भिसे, उपाध्यक्षपदी बाबुराव देशमुख, बळीराम सोळंके, महामंत्रीपदी किशोर ब्रम्हनाथकर,मंत्री पदी कैलास ढोले, मदन देशपांडे, संघटन मंत्रिपदी दादा लाड, सदस्य पदी चंदन पाटील, बबनराव केंजळे, ॲड. अजय तल्हार आदीची निवड करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

  • उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी भाव व खरेदीची हमी.

  • शेतकऱ्यांवर लादलेली जीएसटी रद्द करणे.

  • पाणंद शेत रस्त्यांच्या समस्येचे समाधान.

  • जंगली श्वापदांच्या उपद्रवापासून संरक्षणासाठी उपाययोजना.

  • बोगस बियाणे व भेसळयुक्त कृषी निविष्ठांविरोधात कठोर कारवाई.

  • अभ्यास वर्गातील महत्त्वाचे निर्णय आणि उपक्रम

  • कृषी आणि ग्रामीण विकासासाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय.

  • पिकावर नीतिनिर्धारणासाठी अभ्यास गटांची स्थापना.

  • शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर जनजागरण अभियान सुरू.

  • मार्च २०२४ मध्ये विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा महामोर्चा आयोजन.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com