Crop Loan : नांदेडला पीककर्ज वाटपास बँकांचा आखडता हात

Crop Loan Disbursement Update : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील बँकांकडून कर्जवाटप संथगतीने सुरू आहे. त्यातच राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी बँकांनी कर्जवाटपास हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील बँकांकडून कर्जवाटप संथगतीने सुरू आहे. त्यातच राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी बँकांनी कर्जवाटपास हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे. ३ जूनपर्यंत ३१ हजार ६५२ शेतकऱ्यांना केवळ १६.४२ टक्के कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. बियाणांपासून ते खतापर्यंत सर्व गोष्टींसाठी पीककर्जाचा आधार घेतला जातो. परंतु, कर्जासाठी बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी खेटे मारून त्रस्त झाले आहेत.

Crop Loan
Crop Loan : शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यात व्यापारी बॅंका मागेच

मागील खरीप हंगामात पीक काढणीवेळीच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यानंतर रब्बीतही अवकाळीचा सामना करावा लागला. यामुळे शेतकरी खचून गेला. या सर्व संकटाला तोंड देत पुन्हा एकदा उभारी घेत नव्या जोमाने बळिराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी पैशांची चणचण भासू नये, कामे वेळेत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने पीककर्जाचे वाटप केले जाते. शेतकऱ्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पीककर्ज महत्त्वाचे माध्यम आहे. एप्रिलपासूनच या प्रक्रियेला सुरवात होते. परंतु, बहुतांश खासगी बँका कर्जवाटपास सकारात्मकता दाखवीत नसल्याचे दिसून येते.

Crop Loan
Crop Insurance : ‘बारा टक्के व्याजासह केळी पीकविमाधारकांना परतावे द्या’

नांदेड जिल्ह्याला यावर्षी १८२५ कोटी ७३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु, आतापर्यंत ३१ हजार ६५२ शेतकऱ्यांना २९९ कोटी ८५ लाख ३० हजार रुपये पीककर्ज वितरित केले आहे. यात राष्ट्रीयीकृतमध्ये एसबीआय, तर खासगीमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, महाराष्ट्र ग्रामीण आणि डीसीसी बँकांकडून चांगले पीककर्ज वाटप होत असले, तरी काही बँकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो आहे; तसेच काही खासगी बँकांकडून एकाही शेतकऱ्याला पीककर्ज दिले गेले नसल्याचे साप्ताहिक अहवालातून समोर आले आहे.

कर्जवाटपाचा साप्ताहिक लेखाजोखा

जिल्हा मध्यवर्ती बँकेला ४१६ कोटी ९१ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात ६ हजार ६२९ शेतकऱ्यांना ६० कोटी ३५ लाख ३० हजार रुपये कर्जाचे वितरण केले. या बँकेची कर्ज वितरणाची टक्केवारी १४.४८ इतकी आहे. व्यापारी/खासगी बँकेला ९९३ कोटी १६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात ७ हजार ४०४ शेतकऱ्यांना ७९ कोटी ५६ लाख कर्जाचे वितरण केले. ८.०१ कर्ज वितरणाची टक्केवारी आहे. या बँका कासवगतीने कर्जांचे वितरण करत आहेत, तर ग्रामीण बँक ४१५ कोटी ६६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात १७ हजार ६१९ शेतकऱ्यांना १५९ कोटी ९४ लाख कर्जाचे वितरण केले. ३८.४८ कर्ज वितरणाची टक्केवारी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com