Mobile Addiction : रील नको, रीअल लाइफ जगा

Blue Whale Game : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या मुलाला सतत ''ब्लू व्हेल'' हा ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती.
Mobile Adiction
Mobile AdictionAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Online Game Addiction : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या मुलाला सतत ''ब्लू व्हेल'' हा ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. तसेच तो सतत मोबाईल पाहत असल्याचे त्याच्या आईने सांगितले.

मुलांचे सतत ऑनलाइन गेम व स्क्रीनमध्ये रमण्याचे व्यसन अत्यंत घातक आहे. गेम, रील आणि आभासी जग आयुष्यात खऱ्‍याखुऱ्‍या मैदानी खेळाला मुकलेली मुले ऑनलाइन गेमच्या आहारी जातात. सततच्या गेमिंगमुळे मुले आभासी जगात शिरतात.

त्यांचा वास्तविक जगाशी संबंध तुटतो. या वयात मुलांचा पुरेसा बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकास झालेला नसतो. मुलांना आभासी जगातील नायकच आपला आदर्श वाटू लागतो. हा नायक अत्यंत महत्वाकांक्षी असतो. आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी तो हिंसा करतो. जोरदार मारहाण, गोळीबार, सुसाट गाडी चालवणारा हा नायक मुलांना आवडतो. मुलांमध्ये देखील उपजत ''अहं''भाव असतो.

आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी मुले देखील त्या नायकाप्रमाणे वागण्याचा विचार करतात आणि बऱ्याचदा मुले हिंसक कृत्य करतातही. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे मुलांचे खेळणे कमी झाले यामुळे एकलकोंडेपणा, स्वमग्नता वाढत आहे.

अपुरी झोप, लठ्ठपणा, चिडचिड, आक्रस्ताळेपणा, चटकन रागावणे, चटकन रडणे, सततची डोकेदुखी, निरुत्साहीपणा असे गंभीर शारीरिक व मानसिक आजार मुलांमधे झपाट्याने वाढत आहेत.

मुले एकलकोंडी झाली की त्यांना इतर मुलांसोबत बोलायला, खेळायला आवडत नाही यातून मग मुलांचा स्क्रीन टाइम अधिकच वाढतो. पालकांनी मोबाइल, लॅपटॉप काढून घेण्याचा प्रयत्न केला की मुले चिडचिड करतात, हिंसक वागतात किंवा प्रसंगी आत्महत्याही करतात.

गेमप्रमाणेच तरुणाईमध्ये रील चे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीव संकटात टाकून अनेकजण रील बनवतात. स्टंटबाजी करताना अनेक तरुण-तरुणी आपला जीव गमावत आहेत. रील लाइफ जगणाऱ्‍या या तरुणांकडे रीअल लाइफ जगण्यासाठी आवश्यक असलेले चांगले शिक्षण, विचार आणि रोजगार यांचा अभाव असतो. आपल्या मुलांना रोजगारक्षम आणि विवेकशील बनवणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

Mobile Adiction
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट खा अन् हेल्दी लाइफस्टाईल जगा

मैत्री आणि शिस्त मुले आणि पालक यांच्यात सुसंवाद आणि मैत्री असावी. मुलांशी गप्पा मारल्या, मुलांसोबत खेळले की मुले मनातील विचार, कल्पना आणि रील नको, रीअल लाइफ जगा गेम खेळताना आत्महत्या, रील काढताना होणारे दुर्दैवी मृत्यू, सेल्फी घेताना जाणारे बळी या बातम्यांतून मुलांचा संपत जाणारा विवेक आणि मुलांचे आभासी जीवन याची दाहकता लक्षात येते.

मुलांना या आभासी जगातून बाहेर काढून खरे जीवन शिक्षण देणे हे पालकांचे, शिक्षणव्यवस्थेचे कर्तव्य आहे. भावना पालकांना सांगतात. कुटुंबात सर्वांनी एकत्र जेवण करणे, गप्पा, गोष्टी मारणे आवश्यक आहे. मुलांना भीती दाखवणे, सतत रागवणे यामुळे मुले पालकांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवतात.

पालकांनी मुलांना ऑनलाइन जगताचे धोके समजावून सांगावे, मुलांना सायबर सुरक्षेचे धडे द्यावेत. सायबर पालकत्व नावाची संकल्पना उदयाला येत आहे. ते पालकांनी समजून घ्यायला हवी.

मुले मोठ्या वयाचे असतील तर ऑनलाइन गेम खेळा पैसे कमवा, झटपट लोन ॲप, ऑनलाइन सेक्सटॉर्शन यातील धोके मुलांना समजावून सांगावे. पालकांनीही गरज नसताना मोबाईलचा वापर टाळावा. स्वतःला आवडणारा एखादा छंद जोपासावा.

Mobile Adiction
वर्तमानात जगा!

मुलांनाही अवांतर वाचन, संगीत, कला, गायन, नृत्य किंवा मुलाला आवडतो तो छंद जोपासण्यास प्रोत्साहन आणिस्वातंत्र्य द्यावे. पालकांनी मुलांशी मैत्री करावी म्हणजे ऑनलाइन जगतातील नायकांपासून मुले दूर राहतील.

मुलांचे काही चुकत असेल तर त्याला समजावून सांगावे. मुलांना शिक्षा नको पण शिस्त हवीच. मुलांना मारल्याने शिस्त येते हा गैरसमज पालकांनी दूर करावा. आदर, प्रेम, विश्वास, संवाद, मैत्री यातून मुलांमध्ये शिस्त निर्माण करता येते.

स्वतःही काही शिस्त पाळल्यास मुले अनुकरणातून शिकतात. बऱ्याचदा पालक आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये याची काळजी घेतात. मुलांना आवश्यक सुविधा देताना मुलांना पैशाचे महत्त्व, आर्थिक व्यवहार, व्यवस्थापन याचेही शिक्षण द्यावे.

अभ्यासासाठी मुलांना स्वतंत्र खोली, मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट या सुविधा देताना मुले या सुविधांचा योग्य वापर करतात की नाही हे पालकांनी पाहावे. मुलांना खरचं अमर्याद प्रायव्हसी, अमर्याद इंटरनेट याची आवश्यकता आहे का, या गोष्टी पालकांनी तपासाव्यात.

मुलांचे अतिलाड देखील नकोत. त्यांनी जे मागितले ते ताबडतोब मिळत गेल्यामुळे मुलांना ‘नाही’ची सवय राहत नाही. मुलांना ‘नाही’ची देखील सवय हवीच. सर्वच गोष्टी मुलांना मिळत गेल्यास मुले अधिक हट्टी होतात.

काही वस्तूमिळाल्या नाही तर प्रसंगी आत्महत्याही करतात. खेळा, निसर्गाशी नाते जोडा मुलांमध्ये खेळण्याची, निसर्गाशी जोडण्याची आणि शिकवण्याचीही उपजत वृत्ती असते. मुलांना महागडी खेळणी, टीव्ही, मोबाइल किंवा खूप सारी साधने हवी असतात असे मुळीच नाही. मुलं दगड, माती, पाणी, वाळू, पानं, फुले, काड्या अशा कितीतरी वस्तूंपासून खेळांची निर्मिती करतात. यातून मुले अधिक कल्पक होतात.

समवयस्क मुलांसोबत खेळल्याने मुलांचे शारीरिक, भावनिक आणि सामाजिक भरणपोषण होते. मुलांची ही सहज खेळण्याची प्रवृत्ती पालकच संपवतात. मुलांना खेळण्यासाठी घराजवळ मैदाने उपलब्ध नाहीत तसेच शाळांमध्ये देखील क्रीडांगणे उपलब्ध नाही.

मुलांचा स्क्रिनटाइम वाढतोय (Screen time management) यासाठी मुलांना जबाबदार धरणे योग्य नाही. सृजन करणाऱ्या हातांना सृजनाची संधी दिली नाही तर तेच हात विध्वंस करतात. मुलांना खेळण्यासाठी मैदाने हवीत यासाठी किती पालक आग्रही आहेत?

कुणालाही या विषयाचे गांभीर्यदिसत नाही. जशी मुलं खेळापासून दुरावली तशीच ती निसर्गापासूनही दुरावत चालली आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात माणूस ज्ञानी होतो. निसर्ग माणसाला जगण्यासाठी ऊर्जा देतो.

घर, शाळा, ट्युशन, अभ्यास आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट या गोष्टी जगण्यासाठी पुरेशा नाहीत. मुलांना शेती, माती आणि निसर्गाच्या सान्निध्यात वावरू द्या. निसर्गाच्या सान्निध्यात मुले अधिक हुशार, शांत, संयमी, सुखी, समाधानी, प्रेमळ, सहृदयी, समृद्ध होतील.

मुलांनाही आभासी जगापेक्षा यागोष्टी आवडतात गरज आहे पालकांनी संधी उपलब्ध करून देण्याची! राजहंस व्हा तंत्रज्ञानाने मानवी जीवन अधिक सुखकर झाले. तंत्रज्ञान हे मानवासाठी वरदानच आहे.

मात्र, ते वापरणाऱ्याकडे विवेक नसेल तर ते शाप ठरू शकतो. प्रश्न साधनांचा नाही तर वापर करणाऱ्याचा असतो. राजहंस ज्या प्रमाणे दूध आणि पाणी एकत्र असेल तर दूधच पितो तसे आपली मुलं चिकित्सक, विवेकी व्हावी यासाठी पालकांनी, शिक्षणव्यवस्थेने प्रयत्न करावेत. फोटो, व्हिडिओ, गेम, फेसबुक, व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम हे आभासी, रील लाइफ म्हणजे खरे आयुष्य नव्हे. रीअल लाइफ चे शिक्षण मुलांना घर आणि शाळांतून मिळावे.

शिवाजी काकडे ७८८७५४५५५७ (लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com