Kolhapur Pipeline Leaks
Kolhapur Pipeline Leaksagrowon

Kolhapur Pipeline Leaks : थेट पाईपलाईनला पुन्हा गळती, शेतीच्या नुकसानीला जबाबदार कोण?

Kalammawadi Dam : राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात पाईपलाईन फुटल्याने मोठी गळती लागली आहे. या गळतीने काही हेक्टरवर शेतीमध्ये पाणी जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Published on

Direct Pipeline Leak Kolhapur : मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली थेट पाईपलाईन योजना अखेरीस पूर्णत्वास आली. परंतु थेट पाईपलाईनला गळतीचे ग्रहण लागल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यानंतर पुन्हा आता राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात पाईपलाईन फुटल्याने मोठी गळती लागली आहे. या गळतीने काही हेक्टरवर शेतीमध्ये पाणी जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

काल बुधवारी रात्री तुरंबे (ता. राधानगरी) येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठी गळती लागली. साधारण १९ तासांहून अधिक काळ पाणी शेतात वाहून येतच होते. दरम्यान, या शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून भरपाईची मागणी केली आहे, वारंवार अशाप्रकारची गळती होणार असेल, तर नुकसानीस जबाबदार कोण?, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. परिसरात गेल्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पाईपलाईनला गळती लागली आहे.

कोल्हापूर शहरासाठीची ही थेट पाईपलाईन योजना काही कोटी रुपये खर्चुन अखेर सुरू झाली; मात्र योजनेला वारंवार गळती लागत आहे. गुरुवारी मध्यरात्री तुरंबे कपिलेश्वर मार्गावर बाळासाहेब शेटगे यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आणि पाईपलाईनमधून प्रचंड प्रमाणात पाणी वाहू लागले.

पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांना पाण्याचा आवाज आल्याने ही पावा तथा सर्वत्र पसरली. गळतीमुळे वरून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ते पाणी परिसरातील ऊस पिकामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गळती लागल्याचे लक्षात येताच पाणी बंद कसे करायचे, कोणाशी संपर्क साधायचा, याबद्दल कोणतीही पूर्वसूचना देण्यासाठीची तरतूद या थेट पाईपलाईनच्या मार्गावर कुठेही नाही, त्यामुळे शेतीच्या नुकसानीस जबाबदार कोण?, अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शिवाय घरणाला असलेल्या गळती थांबवण्यासाठी काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. यावर्षी धरणात ७५ टक्के पाणीसाठा होता. शेतीसाठी डाव्या कालव्याला विलंबाने पाणी सोडले जाते. त्यात थेट पाईपलाईनला वारंवार होणारी गळती ही शेतीसाठी घातक ठरणार आहे. सायंकाळी पाचपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू होता.

एअर व्हॉल्व्हमधूनही गळती

मुख्य पाईपलाईन व एअर व्हॉल्व्हमधून गळती सुरू होती, पाण्याचा प्रवाह तुरंबे-कपिलेश्वर दरम्यानच्या ओढ्यातून दूधगंगा नदी पात्रात गेला. या पाण्यामुळे दूधगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत अशंत वाढ झाली. एअर हॉल्व्हमधील पाण्याचे फवारे रस्त्यावर उडत होते. गळती काढण्यासाठी आलेले कर्मचारी पाण्यावर नियंत्रण न आल्यामुळे गळती न काढताच कोल्हापूरला परतले.

Kolhapur Pipeline Leaks
Kolhapur Patgaon Dam : कोल्हापुरातील धरणाच्या पाण्यावर अदानींची नजर, जल विद्युत केंद्रास कृती समितीचा जोरदार विरोध

उपसा आज सायंकाळपासून शक्य

दोन पाईपचा जोड देण्यासाठी त्याच्या अलिकडे मॅनहोल करावा लागतो. जोड दिल्यानंतर तो वेल्डींग करून बंद केलेला होता. त्या मॅनहोलमधून गळती उद्भवली आहे. पंप बंद केल्यानंतरही कपिलेश्वरजवळ थोडा उतार असल्याने पाईपमधील पाणी बाहेर पडण्यास शुक्रवारी सकाळ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो मॅनहोल बंद करण्यास दोन ते तीन तास लागू शकतात. त्यात अन्य काही अडचणी आल्या नाहीत तर शुक्रवार (ता. २२) सायंकाळपर्यंत पाणी उपसा पुन्हा सुरू केला जाऊ शकतो.

कोल्हापूर शहराला पाणी देण्याला आमचा विरोध नाही; परंतु अशाप्रकारे शेतीचे वारंवार नुकसान होणार असेल, तर काळम्मावाडी पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अशाप्रकारे शेतीचे वारंवार नुकसान होत असेल, तर काळम्मावाडी थेट पाईपलाईन संदर्भामध्ये प्रशासनाने गंभीर विचार केला पाहिजे.

अजित पोवार, माजी उपसभापती, पंचायत समिती, राधानगरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com