Agriculture Loan Dhule : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगामासाठी (Kharif Season) ५ एप्रिलपासून पीककर्ज वितरणाची (Crop Loan) तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीक कर्जदार निश्चित केला आहे.
या विषयावर बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतही चर्चा झाली. त्यानुसार लवकरच पीककर्ज वितरणाला सुरवात होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा नुकतीच झाली. त्या वेळी नवीन हंगामासाठी पीक कर्जदार निश्चित करण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जदाराला मान्यता दिली आहे.
त्यानुसार सोयाबीनला ५० हजार, जिरायती कपाशीसाठी ५५ हजार, बागायत कपाशीसाठी ७५ हजार, मिरचीसाठी ६२ हजार ५००, केळीसाठी एक लाख, केळी टिश्युकल्चरसाठी दीड लाख, पपईसाठी ८७ हजार, पूर्व हंगामी उसासाठी एक लाख १० हजार, रोपलागवडीसाठी सव्वा लाख, खोडव्यासाठी ८५ हजार असा प्रतिहेक्टर पीककर्ज दर निश्चित झाला आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दर सारखेच आहेत. सोसायटी, आदिवासी विकास संस्थांकडून मर्यादा पत्रक तयार करून त्याला संचालक मंडळाकडून मंजुरी देण्यात येत आहे. तसेच ५ एप्रिलपासून नवीन पीककर्ज वाटप सुरू होईल.
त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या थकबाकीदारांनी कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा. प्रथम कर्ज भरणा केलेल्या सभासदांना प्रथम कर्जवाटप करण्यात येईल, असेही अध्यक्ष कदमबांडे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.