
Maharashtra Politics : बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येला ५० दिवस उलटले तरी मुख्य आरोपींना कोणतीही पकडण्यात यश आले नाही. यामुळे विरोधकांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रीया देत भूमिका स्पष्ट केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, "जे दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, मीच ही मागणी करतो, राजीनामा फडणवीस आणि अजित पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर मला दोषी मानत असतील, तर त्यांनी राजीनामा मागावा, मी तत्काळ देईन." असे मुंडे म्हणाले.
"माझी नैतिकता प्रामाणिक आहे. जर माझ्यावर दोष सिद्ध झाले, तर वरिष्ठांनी मला निर्णय सांगावा. तसेच मी दिल्ली दिल्ली दौऱ्यावर जात आहे याचा कोणताही राजकीय हेतू नाही. २१व्या शतकात काहीही लपून राहत नाही, त्यामुळे राजकीय चर्चा नसून केवळ कामावर भर दिला जात आहे. असेही मुंडे म्हणाले.
"सरकारकडून संपूर्ण भारतभर कोणत्याही ठिकाणी राशन मिळेल, अशी योजना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मजूर स्थलांतर करतात, पण त्यांना योग्य वेळी धान्य मिळत नाही. यावर त्वरित तोडगा काढला जाईल." असे मंत्री मुंडे म्हणाले.
अंजली दमानिया सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, बीडचे नेते संदीप क्षीरसागर यांनी वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत आणि धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे राजीनामा कसं देणार अशी टीका विरोधकांकडून होत आहे.
केंद्रीय मंत्र्यांची भेट महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील अन्नधान्य वितरण व्यवस्था, ऑनलाईन कामकाज, आणि स्थलांतरित मजुरांना राशन कसे मिळेल यावर सखोल चर्चा झाली. असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.