
Chhatrapati Sambhajinagar News : नाचनवेल, जि. छत्रपती संभाजीनगर : पूर्ण क्षमतेने भरलेल्या अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याची दुरुस्ती नसणे, पाटचाऱ्यांना दरवाजा नसणे यामुळे मिळत नाही. वारंवार निवेदने देऊ नये प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता दाखविली जात नाही.
आता तुम्हीच काहीतरी करा असे म्हणत, नाचनवेल परिसरातील शेतकऱ्यांनी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी मंगळवारी (ता. २८) निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, अंजना पळशी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून लाभक्षेत्रातील मोहाडी-अमदाबाद नाचनवेल, जवखेडा सारोळा आदी शिवारांतील शेतीला रब्बी हंगाम पुढील महिन्यात पिकासाठी पाण्याची आवशकता आहे.
मात्र या प्रकल्पाचे डाव्या-उजव्या कालव्यांच्या पाटचाऱ्या नादुरुस्त असून या मध्ये उंच झाडेझुडपे वाढलेली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. तसेच पाटचाऱ्याणा दरवाजे नाहीत. अंजना नदीपात्रात अंदाजे १५-२० गावांचा पाणीपुरवठा विहिरी आहेत. उन्हाळ्यात प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यावे टंचाई भागते. प्रशासनाकडून पाणीपुरवठा टँकरसाठी लाखो रुपये खर्च होतो.
लाभ क्षेत्रातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी उजव्या कालव्याद्वारे प्रकल्पाचे पाणी सोडण्याची गरज आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरील खर्च कमी होईल व गावे टँकरमुक्त होतील व लाभ क्षेतस्तील शेतीलाही फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अमदाबाद व चीचखोरी पाझर तलाव असून उजव्या कालव्यावर जवखेडा पाझर तलाव आहे.
आमदार जाधव यांनी तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची व मागणी पूर्ण करण्याची सूचना केली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत समस्या निवारण्यासाठी सर्वे करण्याकरिता पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी बोलवण्यात येईल व हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला जाईल, असे सांगितले. या वेळी आमदाबाद, मोहाडी, जवखेडा, आडगाव, नाचनवेल, कोपरवेल गावातील शेतकरी उपस्थित होते.
साफसफाईसाठीचा निधी जातो कुठे?
४ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर असताना दोन वर्षे झाले तरी दुरुस्तीचे काम का होत नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेटमधील गळती काढली तर मोहाडी शिवारात गळती सुरूच आहे. मुळात दरवर्षी कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या साफसफाईसाठी येणारा निधी जातो कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.