Dhamni Yatra : धामणीची म्हाळसाकांत खंडोबा यात्रा शनिवारपासून

Mhalsakant Khandoba Yatra : आंबेगाव तालुक्यातील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेनिमित्त शनिवार (ता. २४) ते रविवार (ता. २५) अशी दोन दिवस होणार आहे.
Dhamni Yatra
Dhamni Yatra Agrowon

Pune News : पारगाव, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यातील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेनिमित्त शनिवार (ता. २४) ते रविवार (ता. २५) अशी दोन दिवस होणार आहे. यात्रा कालावधीत नवसाच्या बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, करमणुकीच्या कार्यक्रमाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीने दिली आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तसेच पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेला भरते. यात्रेनिमित शनिवारी सकाळी ८ ते ९ देवास हारतुरे, ११ ते ४ बैल व बगाडांच्या मिरवणूक व नवसाच्या बैलगाडा शर्यती, सायंकाळी ८ ते १० छबिना व पालखी सोहळा, रात्री १० वाजता भिका-भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

Dhamni Yatra
Siddheshwar Yatra : सिद्धेश्वर यात्रा आयोजनासाठी समन्वय ठेवा

रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत शाहीर रामदास गुंड आणि पार्टी (तुरेवाले) व शाहीर नाना साळुंखे आणि पार्टी (कलगीवाले) यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ६ कुस्त्यांचा आखाडा रात्री ९ वाजता वसंतराव नांदवळकरसह रवींद्र पिंपळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी यात्रा शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आल्याने यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होणार असून त्या दृष्टीने जय्यत तयारी धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील लाखो भाविक मोठ्या संख्येने येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतात. हे यात्रेचे खास वैशिष्ट्य येथील खंडोबाच्या नवसाची बगाडे आणि बैलगाडे पळवले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे इनाम, बक्षिसे ठेवली जात नाही. भाविक भक्त आपल्या देवाच्या श्रद्धेपोटी धामणी घाटात नवसाचे बैलगाडे आणून पळवितात. नवसाचे गाडे पाहाण्यासाठी गाडाशौकिन आणि गाडा मालकांची मोठी गर्दी असते. भाविकांना सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध करून दिल्या आहेत, असे देवस्थान, यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकाश पाटील जाधव, यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम पाटील जाधव, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले व माजी सरपंच सागर जाधव यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com