Devgad Hapus : देवगड हापूसवर आता ‘युनिक कोड’ देणार

Unique Code Authenticity : देवगड हापूसचा दर्जा राखण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्याच्या हेतूने देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय आंबा उत्पादक संस्थेने घेतला आहे.
Devgad Hapus
Devgad HapusAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : देवगड हापूसचा दर्जा राखण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्याच्या हेतूने देवगड हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय आंबा उत्पादक संस्थेने घेतला आहे. या निर्णयामुळे हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बनावट विक्रीला पायबंद बसणार आहे.

देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने जामसंडे येथे आंबा बागायतदार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला संस्थेचे अध्यक्ष ॲड अजित गोगटे, उपाध्यक्ष डी. बी. बलवान, सुधीर जोशी, संतोष पाटकर, जीआय तज्ज्ञ ओंकार सप्रे, युनिक कोड व्यवस्था तज्ज्ञ प्रशांत यादव, ऋषिकेश उलपे आदी उपस्थित होते.

Devgad Hapus
Devgad Hapus Unique Code : अस्सल देवगड हापूसवर आता ‘युनिक कोड’; बागायतदारांचा दर्जा राखण्यासाठी निर्णय

आंबा बागायतदारांच्या चर्चासत्रात प्रामुख्याने देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बनावट विक्रीला पायबंद घालण्यावर चर्चा झाली. देवगड हापूसला जगभरात पंसती असल्यामुळे त्याच नावाने अन्य आंब्याची विक्री केली जाते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते आणि देवगड आंब्याविषयी ग्राहकांच्या मनात सभ्रंमाचे वातावरण निर्माण होते.

हे थांबले पाहिजे यावर सर्व बागायतदारांचे एकमत झाले. सध्या हापूस आंब्याला ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी जीआय मानांकन मिळालेले आहे. परंतु बाजारात देवगड हापूसला पसंती असल्यामुळे देवगड हापूससाठी स्वतंत्र जीआय मिळावा यासाठी संस्थेने पुन्हा प्रयत्न करावेत, अशी मागणी आंबा उत्पादकांनी केली.

Devgad Hapus
Devgad Hapus Mango : पाडाला पिकला ५२५ ग्रॅमचा देवगड हापूस आंबा

देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट विक्री थांबविण्यासाठी यापुढे देवगड हापूसवर युनिक कोड देण्याचा निर्णय या चर्चासत्रा दरम्यान घेण्यात आला. युनिक कोड पेटंट मिळालेल्या मुंबईतील एका कंपनीबरोबर संस्थेने करार केला असल्याची माहिती संस्था अध्यक्ष श्री. गोगटे यांनी दिली. यामुळे देवगड हापूसच्या नावाने होणाऱ्या बनावट विक्रीला चाप बसणार आहे.

युनिक कोडचा बनावट वापर होऊ नये म्हणून ते संस्थेकडून वितरित करण्यात येतील. प्रत्येक आंबा उत्पादकांची सातबारावरील आंबा कलमे आणि उत्पादनक्षमता तपासून जीआय धारक उत्पादकालाच युनिक कोड दिला जाणार आहे. हे पहिलेच वर्ष असल्यामुळे सर्व प्रकिया पूर्ण होण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उत्पादकांनी १० जानेवारीपर्यंत संस्थेकडे नोंदणी करावी.
ॲड. अजित गोगटे, अध्यक्ष, देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था, देवगड, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com