Devgad Hapus Mango : पाडाला पिकला ५२५ ग्रॅमचा देवगड हापूस आंबा

Mahesh Gaikwad

आंबा हंगाम

देशासह महाराष्ट्रात कोकणचा हापूस बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

आंबा काढणी

यंदाच्या हंगामासाठी झाडावरून फळे उतरविण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

५२५ ग्रॅमचा आंबा

अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुत्यातील बापर्डे गावातील आंबा बागायातदार पुरूषोत्तम नाईकधुरे यांच्या बागेतील एका झाडावर चक्का ५२५ ग्रॅम वजनाचा आंबा आढळून आला आहे. त्यानंतर तीन दिवसांनी फळाच्या वजनात २२ ग्रॅमने घट झाली. 

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

देवगड हापूस

सामान्यत: देवगड हापूसच्या फळाचे वजन २०० ते २५० ग्रॅमपर्यंत भरते. योग्य व्यवस्थापन केल्यास ३५० ग्रॅमपर्यंतही वजन वाढते.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

आंबा बाग

नाईकधुरे यांची १०० हून अधिक झाडांची आंबा बाग आहे. याच बागेत सध्या आंबा काढणी सुरू आहे.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

फळांचा आकार

काढणी दरम्यान त्यांना एका झाडावरील फळांचा आकार इतर झाडांच्या तुलनेत मोठा असल्याचे निदर्शनास आले. या झाडावरील एका फळाचे वजन केले असता ते ५२५ ग्रॅम होते. तीन दिवसांनी पुन्हा वजन केल्यावर त्यात २२ ग्रॅमची घट झाली.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar

फळांचे वजन

याबाबतची माहिती नाईकधुरे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळवली. त्यांनी देखील फळांच्या वजनाची खातरजमा केली असता ४५० ते ४८० ग्रॅम वजनाची अनेक फळे आढळून आली.

Devgad Hapus Mango | Eknath Pawar