Ratnagiri Development : रत्नागिरी जिल्ह्याचा विकास खुंटलेला

Narayan Rane : पैसा हे प्रगतीचे प्रतीक आहे. मेहनत, परिश्रमाला बुद्धीची जोड देऊन अदानी, अंबानींसारखे उद्योजक बना. मी मनोरंजनासाठी आलो नाही. मला हाक मारली तर मी ओ म्हणेन. माझा उपयोग करून घ्या, असे आवाहन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
Narayan Rane
Narayan RaneAgrowon

Ratnagiri News : मी राजकारण करण्यासाठी आलो नाही, तर उद्योजकांना मोठे करण्यासाठी आलोय. आज सिंधुदुर्ग दरडोई उत्पन्नात २ लाख ४० हजारांवर आहे. रायगड जिल्ह्याचा विकास झाला, परंतु रत्नागिरी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. दरडोई उत्पन्न १ लाख ८४ हजार आहे.

पैसा हे प्रगतीचे प्रतीक आहे. मेहनत, परिश्रमाला बुद्धीची जोड देऊन अदानी, अंबानींसारखे उद्योजक बना. मी मनोरंजनासाठी आलो नाही. मला हाक मारली तर मी ओ म्हणेन. माझा उपयोग करून घ्या, असे आवाहन केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

Narayan Rane
Drought Concessions : मराठवाड्यातील नवीन ७९ मंडलांत दुष्काळी सवलती

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे रत्नागिरी औद्योगिक महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी नारायण राणे बोलत होते. या वेळी खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीतकुमार, गौरव कटारिया, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार विनय नातू, प्रमोद जठार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हाध्यक्ष राजेश सावत आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात या मंत्रालयाचे ५१ लाख उद्योग आहेत. तर रत्नागिरीत फक्त ६५ हजार. कुठे आहोत आपण? चीड यायला पहिजे, असा टोलाही राणे यांनी या वेळी लगावला. ते म्हणाले, की सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय या माझ्या विभागाचे भारतात ७ कोटी उद्योग आहेत. १६ कोटी कामगार आहेत.

Narayan Rane
Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकेल

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा जीडीपी ३० टक्के आहे. देशात निर्यात होणाऱ्या मालाच्या टक्क्यांमध्ये आमचा वाटा ५० टक्के आहे. एवढ्या मोठ्या खात्यात एवढे विभाग आहेत. त्यात रत्नागिरी कुठे आहे, त्याच विचार करा. सोलापूर, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून उद्योजक मला दिल्लीत भेटायला येतात. पण कोकणातून एक माणूस येत नाही, याची खंत वाटते. पुढारी भरपूर आहेत, परंतु व्यवसायासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. व्यवसाय केला तर कोकणाला आर्थिक सुबत्ता येईल.

राजापूर येथे रिफायनरीसाठी प्रयत्न

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आहे. या ठिकाणी मी उमेदवार असेन किंवा नाही, हे वरिष्ठ ठरवतील. मात्र लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. त्यासंदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील, असे मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. तसेच राजापूर येथे रिफायनरी आणण्यासाठी माझे संबंधित मंत्र्यांशी बोलणे सुरू आहे. संबंधित खात्याचे मंत्री वरिष्ठ पातळीवर बोलणी करत आहेत. रिफायनरीमुळे रत्नागिरीचा मोठा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com