Agriculture Development : हवामानानुसार तग धरणारे वाण विकसित करा

Dhananjay Munde : विविध पिकांचे वाण तसेच उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान कृषी शास्त्रज्ञांना स्वीकारावे लागेल.
Inauguration of Agricultural Fair
Inauguration of Agricultural FairAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : ‘‘हवामान बदलामुळे शेती व शेतकऱ्यांपुढे असंख्य आव्हाने निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत तग धरून राहणारे विविध पिकांचे वाण तसेच उत्पादन खर्च कमी करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हान कृषी शास्त्रज्ञांना स्वीकारावे लागेल. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी शासनाचे पाठबळ राहील,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचे उद्घाटन बुधवारी (ता.२१) दूरदृष्यप्रणालीव्दारे श्री. मुंडे यांनी केले. अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. विशेष अतिथी म्‍हणून राज्‍य कृषिमूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल, भारतीय कृषी संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. ए. के. सिंग, खासदार फौजिया खान, राष्‍ट्रीय कामधेनू आयोगाचे सदस्‍य सुनील मानसिंगका,

Inauguration of Agricultural Fair
Jalyukt Shiwar : ‘जलयुक्त’चे दफ्तर ‘जलसंधारण’मध्ये पडून

भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, प्रदेश संघटन मंत्री दादा लाड, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, डॉ. अशोक ढवण, सिनेअभिनेता उपेंद्र लिमये, नियोजन आयोगाचे माजी सदस्‍य डॉ. व्ही. व्ही. सदामते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर आदी उपस्थित होते.

Inauguration of Agricultural Fair
Sugarcane FRP Rate : उसाच्या एफआरपीमध्ये अडीचशे रूपयांची वाढ; उसाला मिळणार प्रति टन ३४०० रुपये दर

‘‘वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेल्या संकटात संधी शोधून शेतकऱ्यांना पुढे जावे लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा लागेल. डिजिटल शेती, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा उपयोग शेतीत करावा लागेल. शेतीमालाचा २० ते २५ टक्के उत्पादन खर्च कमी झाला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. किमान आधारभूत किंमत वाढवून मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेती व शेतकऱ्यांसाठी कठीण काळ आहे. परंतु यात संधी शोधून शेतकरी पुढे जातील,’’ असा विश्‍वास श्री. मुंडे व्यक्त केला.

श्री. पटेल म्हणाले,‘‘जागतिक तापमान वाढीमुळे शेतीसह पृथ्वीवरील मानवी अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. वनांचे प्रमाण वाढवावे लागेल.’’ तर ‘‘शेतकरी हा मातीतील अस्सल कलाकार आहे. शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे,’’ असे उपेंद्र लिमये यांनी सांगितले.

या कृषी मेळाव्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यासह दादरा नगर हवेली, दीव दमण या केंद्र शासित प्रदेशातील शेतकरी, कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ आदी सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com