Fadnavis As Chief Minister
Fadnavis As Chief MinisterAgrowon

Fadnavis As Chief Minister : मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचे नाव निश्चित?; मुख्यमंत्री कोण आज होणार फैसला

Maharashtra Election 2024 : राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले असून आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
Published on

Pune News : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून अद्याप मुख्यमंत्री कोण यावर पडदा कायम आहे. दरम्यान महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठी बैठका सुरू असून यावर निर्णय भाजपची केंद्रीय समिती घेणार आहे. पण याआधीच महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले आहे. याबाबत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील दुजोरा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले असून वाढलेल्या मतदानातील टक्केवारीचा फायदा झाला आहे. यंदा ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून ते लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक आहे.

Fadnavis As Chief Minister
Maharashtra Election 2024 : मोदी साहेब! शेतकऱ्यांनी साथ दिली, आता शब्द पाळा; कर्जमाफी, सोयाबीनला ६ हजार हमीभाव आणि भावांतरची तातडीने अंमलबजावणी करा

भाजपने १३२ जागा जिंकल्या असून शिवेसना (शिंदे) ५७, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २० ठिकाणी विजय मिळविला. महायुतीने एकूण २३५ जागा जिंकल्या असून मविआ फक्त ४६ आणि समाजवादी पार्टी २ आणि इतरांनी १० जागा जिंकल्या आहेत.

सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीचा आकडा बहुमताच्या आकड्यापेक्षाही जादा असून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. कार्यकर्त्यांकडूनही मुख्यमंत्री भाजपचाच असावा अशी आग्रही मागणी होत आहे.

Fadnavis As Chief Minister
Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर याबाबत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दुजोरा दिला असून फडणवीस यांचे नाव निश्चित होण्याचा भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला आंनद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील तमाम जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यामागे आपलं बहुमत दिल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे.

याआधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठिंबा दिली आहे. तर आज नवी दिल्लीत मुख्यमंत्रिपदासाठी बैठक होणार आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Fadnavis As Chief Minister
Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी २ फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला असावा अशी मागणी शिंदे गटाची आहे. ज्यात पहिल्या अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद भाजपकडे आणि दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल.

तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रि‍पदासाठी २-२-१ असा फॉर्म्युल्यावर चर्चा झाली आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com