Mahesh Gaikwad
देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या की सर्वसामान्य वस्तूंच्या किमतही वाढतात. डिझेलच्या वाढत्या किमतींचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो.
शेतकऱ्यांचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या हेतूने बिहार सराकरने शेतकऱ्यांना डिझेलसाठी अनुदान योजनेला मंजुरी दिली आहे.
बिहार सरकारच्या या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी अुदानावर डिझेल उपलब्ध करून दिले जाते.
बिहार सराकरच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. चालू आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाने या योजनेसाठी १५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
सिंचनाच्या डिझेल पंपसेटसाठी खरेदी केलेल्या डिझेलवर प्रतिलिटर ७५ रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सिंचनासाठी प्रति एकर ७५० रुपये या दराने डिझेल अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान प्रति शेतकरी जास्तीत जास्त ८ एकरांसाठीच्या सिंचनासाठी असणार आहे.
या संदर्भात बिहार सरकारच्या कृषी विभागाने अधिकृत अधिसुचना जारी केली आहे.