Kolhapur Flood : ‘रेड लाईन’मधील बेकायदा बांधकामे पाडा, विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना खडे बोल

Red Zone Consturuction : बेकायदेशीर बांधकामे पाडा, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
Kolhapur Flood
Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Divisional Commissioner In Kolhapur : शहर आणि ग्रामीण भागातील रेड लाईनमधील बांधकामांची पाहणी करा. त्यामधील बेकायदेशीर बांधकामे पाडा, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काल(ता.०७) उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले, ‘‘रेड झोनमधील बांधकाम परवाने डोळ्यात तेल घालून पाहा आणि रोखा.’’

त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. त्यानंतर पुलकुंडवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पिलर ब्रिजबाबत पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील परस्पर समन्वयाने महापुराची तीव्रता वाढली नाही. दोन्ही राज्यांतील समन्वयाने आलमट्टी धरणातील विसर्गही व्यवस्थित झाला; मात्र, भविष्यात पुराची तीव्रता वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रेडझोनमधील बेकायदेशीर बांधकामे पाडा.

Kolhapur Flood
Kolhapur Sugar Office : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला कोणी वालीच नाही, अधिकारी टाळे ठोकून झाले गायब

रेडझोनमध्ये बांधकामांना परवानगी मिळणार नाही, यासाठी डोळ्यात तेल घालून पाहा. नदीकाठी असणारी लहान गावेही आता मोठी झाली आहेत. तेथील रेड आणि ब्ल्यू लाईनमधील बांधकामांची पाहणी करा. ब्ल्यू लाईनमधील पूर्वीच्या बांधकामांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात नवे धोरण ठरवण्याचा विचार सरू आहे.’

पंचनाम्यांचे चित्रीकरण करा...

घरांची पडझड, शेतीचे नुकसान याचे पंचनामे करताना चित्रीकरण करा. पुराचे पाणी ओसरल्यावर तत्काळ पंचनामे सुरू करा, अशी सूचना बैठकीदरम्यान केल्याचे पुलकुंडवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com