Revenue Department : पुणे जिल्ह्यातील कोतवालाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

Kotwal Problems : जिल्ह्यातील शासकीय विभागातील रिक्त कोतवालांची पदे भरण्यात यावीत, शिपाई पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी, यांसह कोतवालांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.
Revenue Department
Revenue Department Agrowon

Pune News : जिल्ह्यातील शासकीय विभागातील रिक्त कोतवालांची पदे भरण्यात यावीत, शिपाई पदावर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात यावी, यांसह कोतवालांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आले.

Revenue Department
Revenue Department : मंगळवेढा महसूल विभागात विविध जागांची ३१ पदे रिक्त

जिल्ह्यातील कोतवाल संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव शिंदे, चिटणीस संतोष कुटे, गणेश पवार, शेखर खंडाळे, शरद काळे, अब्दुल शेख, सोमनाथ कालेकर, बाळासाहेब घोडे, भाऊसाहेब अंदुरे, प्रवीण सोनवणे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

(ॲग्रो विशेष)

Revenue Department
Revenue Department : तुळजापूर शहर भूमीअभिलेख कार्यालय बनले समस्यांचे आगार

निवेदनात म्हटले आहे, की कोतवालांची विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस प्रशासनाकडून सरकारी पंच म्हणून नेमणूक केली जाते, ती रद्द करण्यात यावी, तलाठी कार्यालयातील खासगी मदतनीस काढून टाकावेत, सर्व कोतवालांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळावा,

सेवानिवृत्त कोतवालांना अर्जित रजा रोखीकरण लाभ २४० दिवसांचा दिला जातो, तो लाभ ३०० दिवसांचा मिळावा, कोतवालांचे पगार पाच तारखेच्या आत व्हावेत, कोतवालांना वेळोवेळी तहसील कार्यालय अथवा वरिष्ठ कार्यालयात कामासाठी बोलविल्यास त्यांना प्रवास भत्ता देण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com