Dimbhe Dam : डिंभे धरणातून पाणी सोडण्याची मागणी

Water Shortage : जून महिना सुरू झाला, तरी अद्याप पाऊस पडलेला नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे.
Dimbhe Dam
Dimbhe DamAgrowon
Published on
Updated on

Pune Water News : जून महिना सुरू झाला, तरी अद्याप पाऊस पडलेला नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्यातील पश्‍चिम भागातील ३५ गावांतील शेतकऱ्यांनी हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याकडे केली आहे.

सध्या जून महिना निम्मा संपत आला आहे, तरीही पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी, शेतातील उभी पिके सध्या जळत आहेत. विहिरी आणि तळ्यातील पाणी आटले आहे.

वळवाचा पाऊस होईल अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु वळवाचा पाऊसही झालेला नाही. त्याचप्रमाणे जे पाणी आहे, ते पाणी उपसण्यासाठी विजेची नित्य गरज असते. मात्र सध्या वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Dimbhe Dam
Dimbhe Dam Water : डिंभे धरणाचे पाणी पळविले तर आम्ही तुरुंगांत जाऊ

वेळेवर वीज येत नसल्याने नदीला असणारे पाणी, तसेच विहिरीतील थोडेफार असणारे पाणी शेती पिकांना देता येत नाही. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या उभी पिके जळून जाताना दिसत आहेत.

डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी अनिल वाळूज यांनी केली आहे. उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास जेणेकरून या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होईल आणि पिकांना जीवदान मिळेल.

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. विहिरी, तलावामधील पाणी कमी झाले आहे. जे पाणी आहे, तेही भारनियमामुळे वापरता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी अडचणीत येत असून उभी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे उजव्या कालव्याला पाणी सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
बाळासाहेब मेंगडे, सरपंच, मेंगडेवाडी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com