US Farmers Package: अमेरिकेतील शेतकऱ्यांची नुकसान भरून देण्याची मागणी; मोठ्या पॅकेजची अपेक्षा

Economic Package Demand: आयात महाग होऊन निविष्ठा आणि अवजारांच्या किमती वाढणार आहेत. होणारे नुकसान भरून देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आता अमेरिकेतील शेतकरी करत आहेत.
US Farmer
US FarmerAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिकेतील शेतकरी आधीच वाढता उत्पादन खर्च आणि पडलेल्या शेतीमालाच्या किमतीमुळे अडचणीत आले आहेत. त्यातच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या शेतीमालाचे मुख्य आयातदार असलेल्या चीन, कॅनडा आणि मेक्सिकोसोबत व्यापार युध्द छेडले आहे. याचा निर्यातीवर परिणाम तर होणारच आहेच शिवाय आयात महाग होऊन निविष्ठा आणि अवजारांच्या किमती वाढणार आहेत. होणारे नुकसान भरून देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आता अमेरिकेतील शेतकरी करत आहेत.

अमेरिकेची शेतीमाल बाजारपेठ निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अमेरिकेच्या शेतीतून येणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल २० टक्के निर्यातीतून येते. अमेरिकेतून २०२४ मध्ये १७ हजार ६०० कोटी डाॅलरच्या शेतीमालाची निर्यात झाली होती. यात सोयाबीन, पशुधन उत्पादने, ट्रीनट्स, फळे, भाजीपाला, धान्य आणि पुशखाद्याचा समावेश होता.

US Farmer
US Import Duty: अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्काला स्थगिती

अमेरिकेने २०२४ मध्ये केलेल्या एकूण निर्यातीपैकी ४७ टक्के निर्यात फक्त तीन देशांना झाली होती. हे तीन देश म्हणजे मेक्सिको, कॅनडा आणि चीन. मेक्सिकोला एकूण निर्यातीपैकी १७.२ टक्के निर्यात झाली होती. तर कॅनडाला १६.१ टक्के आणि चीनला एकूण निर्यातीपैकी १४ टक्के शेतीमालाची निर्यात झाली होती. पण नेमकं याच देशांसोबत अमेरिकेचे व्यापारी युध्द सुरु आहे.

अमेरिकेने मेक्सिको आणि कॅनडावरील आयात शुल्काला ९० दिवसांची स्थिगिती दिली. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणावर विश्वास नसल्याने कधी काय निर्णय होईल सांगता येत नाही, असे जाणकार सांगत आहेत. चीनवरील आयातशुल्क अमेरिकेने कायम आहे. चीननेही अमेरिकेवर आयात शुल्क लावले. अमेरिकेने चीनच्या आयातीवर १४५ टक्के शुल्क लावले तर चीनने अमेरिकेच्या आयातीवर १२५ टक्के शुल्क लावले आहे.

अमेरिकी सरकारच्या व्यापार युध्दामुळे येथील शेतकऱ्यांना सोयाबीन, मका, कापूस आणि इतर शेतीमाल निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे. अमेरिकेच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाची निर्यात होत असते. तर चीन अमेरिकेच्या सोयाबीनचा मोठा ग्राहक आहे. आधीच जागतिक बाजारात शेतीमालाच्या किमती मागील दोन वर्षांपासून कमी झाल्या आहेत. आता ट्रम्प यांच्या व्यापार युध्दामुळे किमती आणखी कमी झाल्या. तसेच निर्यातही कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा देशातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.

US Farmer
US-China Relation : चीनच्या आयात शुल्काचा अमेरिकी शेतकऱ्यांना धसका

शेतकरी आधीच अडचणीत

अमेरिकेतील शेतकरी वाढता उत्पादन खर्च आणि पडलेल्या शेतीमालाच्या किमतीमुळे अडचणीत आले आहेत. निविष्ठांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे अमेरिकेने मागच्या वर्षी शेतकऱ्यांना १ हजार कोटी डाॅलरचे विशेष पॅकेज दिले होते. आता पुन्हा अमेरिकेने आयातीवर शुल्क लावले आहे. त्यामुळे आयात होणाऱ्या निविष्ठा आणि अवजारांच्या किमती वाढणार आहेत. शेती आवजारे, कीटकनाशके आणि खतांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना महागाईचा फटका बसणार आहे.

पहिल्या कार्यकाळातील नुकसान

डोनाल्ड ट्रम्प हे २०१७ ते २०२१ या काळातही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. पहिल्या कार्यकाळाताही त्यांनी व्यापार युध्द सुरु केले होते. त्यांच्या या व्यापार युध्दाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, या काळात अमेरिकेतून शेतीमालाची निर्यात २ हजार ७०० कोटी डाॅलरनी कमी झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी २३०० कोटी डाॅलरची मदत दिली होती.

मोठ्या पॅकेजची अपेक्षा

ट्रम्प सरकारने पहिल्या कार्यकाळात दिलेल्या पॅकेजपेक्षा आता मोठ्या पॅकेजची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आधीच मागील तीन वर्षांपासून शेतीमालाच्या किमती कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांची गुंतवणूक भरून निघणे मुश्किल झाले आहे. निर्यातीवर परिणाम तर होणारच आहे. पण आयात शुल्कामुळे निविष्ठा आणि अवजारे आणखी महाग होऊन उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे हे व्यापार युध्द जेवढा जास्त काळ चालेल तेवढे जास्त पॅकेजची घोषणा करावी लागेल, असे अमेरिकेतील शेतकरी मागणी करत आहेत. अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक राॅलिंस यांनीही सरकार शेतकरी आणि पशुपालकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरण आखत असल्याचे सांगितले. तसेच निर्माण झालेली समस्या काही काळ असेल असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com