Summer Heat : उन्हाळ्यातील विविध आजारांवर गुणकारी वाळा

Team Agrowon

औषधी गुणधर्माच्या वाळ्याला उन्हाळ्यात विशेष महत्व आहे.

Summer Heat | Agrowon

वाळ्याच्या मुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

Summer Heat | Agrowon

माठ किंवा पिंपातील पाण्यात वाळा टाकला जातो. ते सुगंधी पाणी प्यायल्यास तहान भागते आणि थंडावा मिळतो.

Summer Heat | Agrowon

वाळा थंड गुणात्मक असल्यामुळे पित्तशामक विशेषतः ‘आग’ कमी करतो. 

Summer Heat | Agrowon

उन्हाळ्यात खूप घाम येणे सामान्य आहे. मात्र काहींना पित्तामुळे जास्त प्रमाणात येतो. अशावेळी वाळा पावडर उटण्याप्रमाणे अंगास लावावी.

Summer Heat | Agrowon

त्वचेवर काही कारणांनी लालसरपणा येतो. कीटक चावल्यामुळे आग होते. त्यावेळी चंदन आणि वाळा यांचा लेप लावावा. आग कमी होण्यास मदत होते.

Summer Heat | Agrowon

उन्हाळ्यात किंवा मुत्रमार्गात जंतूसंसर्ग झाल्यामुळे लघवी कमी प्रमाणात होऊन आग होते. अशावेळी वाळा पावडर खडीसाखर, तांदळाच्या धुवणासह वापरावी. 

Summer Heat | Agrowon