News: दिल्ली सरकारने महिलांसाठी ‘पिंक कार्ड’ आणि ‘लखपती बिटिया’ या दोन मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. पिंक कार्डमुळे महिलांना डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास करता येणार असून, लखपती बिटिया योजनेत मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच रेशन कार्डधारकांना वर्षातून दोन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले..मुलींच्या नावावर ६१ हजार रुपये जमा होणार…‘लखपती बिटिया’ योजनेमुळे मुलींच्या भविष्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. आधीची लाडली योजना आता अधिक आधुनिक आणि डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे. पात्र मुलींच्या नावावर एकूण ६१ हजार रुपये जमा केले जातील. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ही रक्कम वाढून एक लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे..lakhpati Didi Scheme : ‘लखपती दीदी’मुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ.महिलांना डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास…पिंक कार्डमुळे महिलांना डीटीसी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुढे मेट्रो आणि आरआरटीएसमध्येही या कार्डचा वापर करता येईल. हे कार्ड आधार आणि मोबाईल क्रमांकाशी जोडले जाईल. या संपूर्ण योजनेचा खर्च सरकार उचलणार आहे..Lakhpati Didi Yojana: ‘लखपती दीदी’ योजनेचा अमरावतीत बोलबाला; महिलांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ.दोन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार…रेशन कार्डधारक कुटुंबांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे. होळी आणि दिवाळी या सणांच्या वेळी वर्षातून दोन मोफत एलपीजी सिलेंडर दिले जाणार आहेत. होळीच्या निमित्ताने ८५३ रुपयांची पहिली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे २४२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे..या योजनेअंतर्गत सुमारे ४० हजार खात्यांमध्ये १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिलांच्या सुरक्षितता आणि शिक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. या निर्णयांमुळे दिल्लीतील महिलांना मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.