
Buldana News : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्याला २०२५-२६ साठी ६४ हजार १५५ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६४ हजार कुटुंबांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.
प्रत्येकाला आपले सुंदर असे घर असावे अशी इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांच्या घराचे स्वप्न साकारल्या जात नाही. पण अशा गरजुंना केंद्र सरकारच्या वतीने घरकुल योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी ४६५१, मोताळा ४२२७, चिखली ८२१३, मेहकर ८२०८, लोणार ३५९६, सिंदखेड राजा ६२५२, देऊळगाव राजा २८२७, खामगाव ७१४९, शेगाव २३४२, मलकापूर ३४३२, नांदुरा ४८०८, जळगांव जामोद ३९७६ आणि संग्रामपूर तालुक्यासाठी ४४७४ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाल्याने एकाच आर्थिक वर्षात ६४१५५ कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान घरकुल योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. बुलडाणा जिल्ह्यातील घरकुलांची प्रतीक्षा यादी ही १ लाख १२ हजार एवढी आहे. दरवर्षी कमी उद्दिष्ट प्राप्त होत असल्याने प्रतीक्षा यादी हळूहळू कमी होत होती.
या वर्षी मोठी उद्दिष्ट प्राप्ती झाल्याने प्रतीक्षा यादी अर्ध्यावर येणार आहे. त्यामुळे उर्वरित प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना पुढील वर्षीपर्यंत लाभ देऊन १०० टक्के कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे, असे जाधव यांनी सांगितले.
घरकुलासाठी कुणीही आर्थिक व्यवहार करू नये
बुलडाणा जिल्ह्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले असून प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतीक्षा यादीप्रमाणे याचा लाभ मिळणार आहे. तालुका स्तरावरून ग्रामपंचायतस्तरावर ही थेट उद्दिष्ट दिलेले असल्याने ग्राम पंचायतींना मिळालेल्या घरकुलांच्या उदिष्टाप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ द्यावा लागणार आहे.
आवश्यक ती कागदपत्रे आणि अटी व शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शिल्लक राहिलेल्या कुटुंबांना घरकुले मिळणार असल्याने कुणीही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन देखील श्री. जाधव यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.