
Nashik News : मनमाड येथील धान्य गुदामातून धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याला धान्यपुरवठा केला जातो. एकट्या नाशिक जिल्ह्याला या दोन्ही जिल्ह्यांपेक्षा दुप्पट धान्य लागते. पण, वेळेअभावी धान्य गुदामातून उचलणे शक्य होत नसल्याने तीन महिन्यांपासून धान्यपुरवठा विस्कळित झाला आहे.
नोव्हेंबरमध्ये अवघे २२ टक्के, तर डिसेंबरमध्ये केवळ नऊ टक्केच धान्य नाशिककरांना उचलता आले. परिणामी, नोव्हेंबरचे ७८ टक्के व डिसेंबरचे ९१ टक्के धान्य एफसीआयच्या गुदामातून पुरवठा विभागाकडे आलेच नाही. नागरिकांच्या घरापर्यंत कसे पोहोचणार, अशी समस्या निर्माण झाली आहे
नाशिकला दरमहा २१ हजार ५०० टन इतके धान्य लागते. धुळ्याला आठ हजार ५०० टन आणि नंदुरबारला सात हजार टन इतक्या धान्याची दरमहा आवश्यकता असते. म्हणजे दोन्ही जिल्ह्यांचे मिळून १५ हजार ५०० टन इतकेच धान्य आहे. नाशिकचे या दोन्ही जिल्ह्यांच्या एकत्रित क्षमतेपेक्षाही अधिक आहे. धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी असतो. या १५ दिवसांच्या कालावधीत प्रत्येकी ३० प्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना आवश्यक धान्याची उचल होते. नाशिकला मात्र ६५ वाहने रोज उचल होणे आवश्यक असताना अवघे ३० ते ३५ ट्रक मिळत असल्याने ५० टक्के तुटवडा होतो.
दोंडाईचावरून पुरवठ्याची अडचण
दोंडाईचा येथील ‘एफसीआय’च्या गुदामातून धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना धान्याचा पुरवठा केला जातो. ‘एफसीआय’चे गुदाम असलेला भाग हा शहराच्या मध्यवस्तीतून जातो. त्यामुळे त्यावरून अवजड वाहने गेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय, लहान मुले असल्याने या भागातून अवजड वाहने नेण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.
दुसऱ्या बाजूने गुदामातील हमालांकडूनही विविध प्रलंबित मागण्या पूर्तींसाठी असहकार आंदोलन केले जाते. याचा परिणाम या गुदामातून धुळे आणि नंदुरबारला जाणाऱ्या धान्याची उचल सहा महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी, या जिल्ह्यांना धान्य नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील एफसीआयच्या गुदामातून दिले जाते. त्याचा परिणाम नाशिककरांना नियमित धान्य पुरवठा होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.