Dipak Chavhan : महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक चव्हाण

Maharashtra Revenue Employees Association : महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी दीपक महादेव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
Dipak Chavhan
Dipak ChavhanAgrowon

Pune News : महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी दीपक महादेव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यवतमाळ येथे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या वेळी पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Dipak Chavhan
Floods and Heavy Rains : महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य, कृषीमंत्री सकारात्मक

दीपक चव्हाण यांची सर्वानुमते राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अजय गौरकार व गजानन टाके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या वेळी हेमंत माळवी, डॉ. रवींद्र देशमुख, नंदकुमार बुटे, किशोर पोहनकर, मंगेश वैद्य, प्रशांत कापडे, विलास कुरणे यांच्यासह विविध कर्मचारी नेते उपस्थित होते.

Dipak Chavhan
Wheat Sowing : दौंड तालुक्यामध्ये ६४३९ हेक्टर गव्हाची पेरणी

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये दिलीप कोलेवाड, प्रशांत कापडे, भैरवनाथ मुंढे, शैलेंद्र सुरेशसिंग परदेशी, दीपाली सचिन तारू, राजश्री आचार्य, शोभना मेश्राम,

सन्यवान माळवे, कैलास कोळेकर, अभिजित येवले, नजीर कुरेशी, विशाल डुकरे, गोवर्धन माने, धैर्यशिल जाधव, प्रणिल पाटील, गणेश साबळे, गजानन खडसे यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी हेमंत माळवी तर कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

या अधिवेशन काळात शासनाकडे महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. आगामी काळात शासनाकडून समस्या व मागण्या सोडवताना कणखर भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com