Loom Industry
Loom IndustryAgrowon

Loom Industry : हातमाग विणकरांना पेंशन देणार

Loom Worker : अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे, यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.
Published on

Nagpur News : ‘‘वयाच्या साठ वर्षांपर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदानाप्रती वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेंशन देण्याचा लवकरच निर्णय घेत असल्याचे सूतोवाच वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येथील नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्‍घाटनही करण्यात आले. या वेळी वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते.

Loom Industry
Loom Holder Electricity Rate : यंत्रमागधारकांना वीज दरवाढीचा झटका, प्रतियुनिट ४० ते ६० पैसे वाढ

अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे, यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. वस्त्रोद्योग व हातमाग या व्यवसायाला येणारा कच्चा माल हा शेतीतूनच येतो.

यात प्रामुख्याने हातमागासाठी वरचेवर मोठ्या प्रमाणात सिल्कची मागणी वाढत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून तुती लागवडीद्वारे रेशीम कोषाची निर्मिती करणारे शेतकरी वाढले आहेत. यात त्यांनी आपल्या कष्टातून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रातला नवा मार्ग समृद्ध केल्याचे पाटील म्हणाले.

...असे आहेत विजेते

राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील वॅल हँगिग (संत कबीर) या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. पैठणी ब्रोकेट साडी या वाणाच्या प्रकाराला गिराम तालेब कबीर या छत्रपती संभाजीनगरच्या विणकराला ४० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. भंडारा येथील कोसा करवती साडी वाणाच्या प्रकारातील मुरलीधर निनावे या विणकराला ३० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

Loom Industry
Loom Industry : हातमाग विणकरांना प्रोत्साहनासाठी स्पर्धा

...असे आहेत विजेते

राज्यस्तरीय पारंपरिक कापड स्पर्धेत गिराम तालेब कबीर या विणकराला पैठणीसाठी प्रथम २० हजार रुपयांचे, दीपक माहुलकर या येवला येथील विणकराला द्वितीय क्रमांकाचे १५ रुपयांचे, तर येवल्याच्याच युवराज परदेशी याला तृतीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हिमरू शाल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या इमरान कुरेशी यांना २० हजार रुपयांचे प्रथम, फैसल कुरेशी यांनी १५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.

करवतीसाठी प्रकारात अनुक्रमे उद्धव निखारे, गंगाधर गोखले, इशिका पौनीकर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार मिळाले. घोंगडी प्रकारात अक्कलकोट येथील सिद्धम्मा कलमनी, रेव्वंमा सिन्नुर, विजयालक्ष्मी हुलमनी या तिन्ही महिलांनीच अनुक्रमे प्रथम ते तृतीय पुरस्कार मिळविले. खण फॅब्रिक प्रकारात उमरेड येथील कृष्णाजी धकाते, यशवंत बारापात्रे (नागपूर) व प्रभाकर निपाने यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. याचबरोबर तुती/टसर लक्षाधीश शेतकऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com