Loom Industry : हातमाग विणकरांना प्रोत्साहनासाठी स्पर्धा

Loom Workers : राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते.
Loom Industry
Loom Industry Agrowon

Solapur News : राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते. यंदाही या विणकरांना प्रोत्साहनासाठी मंगळवारी (ता. १३) सोलापुरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Loom Industry
Power Loom Factory Fire : मालेगाव येथे यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्षस्थानी

प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, कन्ना चौक रविवार पेठ सोलापूर येथे हा कार्यक्रम होईल. प्रामुख्याने यातील कापड स्पर्धेकरिता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपरिक व अपारंपरिक डिझाइनच्या अति उत्कृष्ट नावीन्यपूर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शित वाणांमधून निवड करण्यात येईल. त्यातील उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षीस देऊन हातमाग विणकरांचा सन्मान करण्यात येईल.

Loom Industry
Loom Industry : यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती

विभागीय हातमाग कापड स्पर्धेकरिता पारंपरिक (साड्या, लुगडी, लुंगी, खाणावळी, धोतरे इत्यादी) व अपारंपरिक (टॉवेल, चादरी, शर्टिंग, कोटिंग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हॅगिंग इत्यादी) वाणांचे हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नावीन्यपूर्ण हातमाग, विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी विणकरांकडून प्राप्त झालेले वाण स्पर्धेत प्रदर्शित करण्यात येतील. त्यामधून विभागीय हातमाग कापड निवड समितीमार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येईल.

विणकरांचा बक्षिसाने होणार सन्मान

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग घेऊन प्रदर्शित केलेल्या वाणांमधून प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय २० हजार रुपये व तृतीय बक्षीस १५ हजार रुपये प्रमाणे देऊन हातमाग विणकरांचा प्रशस्तिपत्रासह सन्मान करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com