Sugar Industry : साखर उद्योगाची डोकेदुखी वाढली

Ban On Ethanol Production : केंद्राने साखर हंगाम सुरू झाल्‍यानंतर अपुऱ्या माहितीच्या आधारे अनाकलनीय निर्णय घेऊन साखर उद्योगाची डोकेदुखी वाढविली आहे.
Ethanol production
Ethanol productionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्यानंतर केंद्र सरकारने त्‍यावर मलमपट्टी म्हणून यंदाच्या हंगामात इथेनॉलसाठी साखरेच्या मर्यादित वापराला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला, पण या निर्णयाने साखर उद्योग समाधान झालेला नाही. केंद्राने साखर हंगाम सुरू झाल्‍यानंतर अपुऱ्या माहितीच्या आधारे अनाकलनीय निर्णय घेऊन साखर उद्योगाची डोकेदुखी वाढविली आहे.

इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणे, साखरेच्या दरापेक्षा इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने गेल्‍या दोन-तीन वर्षांपासून सुरू केले. येथून पुढील काळात इथेनॉल निर्मितीच साखर उद्योगाला तारेल, असे वातावरण करत इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखानदारांबरोबरच नव्‍या उद्योजकांनाही हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

अनेकांनी नवे इथेनॉल प्रकल्प उभारले. इथेनॉल निर्मिती सुरू करणार इतक्यात त्यावर बंधने आणली. साखर उद्योगांच्या प्रयत्नांवर वरवंटा फिरविला. कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे साखर उद्योग हबकला. एकत्रित प्रयत्नांनी साखर उद्योगाने केंद्राला माघार घेण्‍यास भाग पाडले.

Ethanol production
Ethanol Production Ban : ऊसरस, सिरप, साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी

अंमलबजावणीच्या सूचनाच नाहीत

१७ लाख टन साखरेला तोंडी परवानगी दिली आहे. पण हा आकडा जाहीर करताना कोणताही अंदाज घेतला नाही. १७ लाख टनांची मर्यादा कोणता अंदाज ठेवून दिली, याचेही उत्तर शासनाकडे नाही. साखर उद्योगातील निराशा पाहून काही तरी निर्णय जाहीर करावा, या विचाराने घाईघाईत हा निर्णय झाला आहे.

हा सगळा कारभार सचिव पातळीवरच होत आहे. याबाबत पंतप्रधानांसहित सहकार मंत्रीही बोलायला तयार नाहीत. विशेष म्हणजे साखर उद्योगाच्‍या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात दोन वेळा पंतप्रधानांसहित सहकार मंत्र्यांची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. पण या बैठका होऊ शकल्या नाहीत. बैठका होण्यापूर्वीच सचिव पातळीवरून हा निर्णय झाला.

...या आहेत अडचणी

- साखर उद्योगाकडून पहिल्‍यांदा माहिती मागवून त्‍यावर विचार करून मगच केंद्राकडून निर्णय अपेक्षित होता.

- पण नोटिफिकेशन काढण्यात किती दिवस जातील, तो पर्यंत कारखान्‍यांनी कोणत्‍या घटकांपासून किती इथेनॉल तयार करायचे, याची कोणतीही कल्‍पना प्रकल्‍पांना नाही. यामुळे गोंधळ

- माध्यमांतून व काही संघटनांकडून केंद्राच्या या माघारीच्या निर्णयामुळे इथेनॉल निर्मिती जोरदार होईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र तशी स्‍थिती नाही

- शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे तयार होणारा रस, साखरेबाबत निर्णय घेणे बनले अडचणीचे

- इथेनॉल निर्मिती ही मंदावलेलीच

Ethanol production
Ethanol Production Ban : ‘सी हेवी मोलॅसीस’पासून इथेनॉलचा पर्याय शोधा

हंगामाच्या मध्याला हटवादीपणा

यंदाचा साखर हंगाम आव्हानात्‍मक परिस्‍थितीत सुरू झाला. उत्तरप्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटकात साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे साखरेसह व इथेनॉल निर्मितीचे गणित घालून कारखान्यांनी दोन्हींची निर्मिती सुरू केली. इथेनॉलवर भर असल्याने पहिल्या दोन महिन्‍यांत सुमारे ६ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली गेल्याचा अंदाज आहे.

आता हंगामासाठी १७ लाख टन साखरेची मर्यादा दिली. पण म्हणजे पुढील दोन महिन्‍यात, मार्चच्या पहिल्या सप्ताहापर्यंत ८० टक्के हंगाम संपण्याचा अंदाज धरल्‍यास सुमारे दहा लाख टन साखरेपासूनच इथेनॉल करता येईल. शासन अजूनही माहिती घेण्याच्याच विचारात आहे. कोणताही ठोस अंदाज केंद्राला येत नसल्यानेच हंगामाच्या मध्याला निर्णय घेण्याची घाई साखर उद्योगाला भोवत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

ऊस उत्पादकांच्या अडचणींतही भर

इथेनॉलमुळे साखर कारखान्‍यांबरोबर ऊस उत्पादकांनाही फायदा होतो. साखरेला कमी दर मिळत असला तरी इथेनॉलच्या आधारे शेतकऱ्‍यांना एफआरपी देण्यासाठी कारखाने प्रयत्न करीत असल्याचे चित्र गेल्या दोन हंगामात दिसले. पण केंद्राने निर्णय घेताना केवळ किरकोळ बाजारातील ग्राहकच डोळ्यासमोर ठेवला. सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक व साखर उद्योग संकटाच्या खाईत लोटला गेल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com