Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : रब्बीतील गहू, हरभऱ्यासाठी १५ डिसेंबरची डेडलाइन

Rabbi Season : ‘एक रुपयात पीकविमा’ योजना व सहभागासाठी आवाहन
Published on

Rabbi Crop Insurance : अमरावती ः यंदाच्या रब्बी हंगाम सुरू झाला असून पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ एक रुपयाचा प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. रब्बीतील गहू व हरभरा ही मुख्य पिके असून या दोन पिकांसह कांदा पिकासाठी विमा काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे.

तर, रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर ही डेडलाइन आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. एक नोव्हेंबरपासून विमा योजना प्रारंभ झाली असून एक रुपया इतकाच प्रीमियम शेतकऱ्यांना भरायचा आहे.

Crop Insurance
Crop Insurance : रब्बीतील ३ लाख ६४ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच

रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती कीडरोग अशा विविध कारणांनी पिकांचे नुकसान झाल्यास बाधित पिकांसाठी शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळण्याची सुविधा आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.

रब्बीतील गहू, हरभरा व कांदा पिकांसाठी विमा काढण्यास एक नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. उन्हाळी धान व भुईमुगासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी उपसंचालक वरुण देशमुख यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com