Kolhapur News : क्षारपड जमीन सुधारणे बरोबरच जमिनीची गुणवत्ता वाढवून शेतकऱ्यांच्या एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यात यशस्वी ठरलेला शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ‘दत्त पॅटर्न’चा डंका आता व्हिएतनाममध्ये वाजणार आहे.
‘शुगरकॉन-२०२४’ या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला ‘सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम’ या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे.
१६ ते १९ सप्टेंबर दरम्यान आय.सी.आय.एस.एफ., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह (व्हिएतनाम) येथे आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन २०२४ परिषदेत प्रबंधाचे मौखिक सादरीकरण होणार आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे २०१६ पासून कारखान्याने हा पॅटर्न सलगपणे राबवला आहे. त्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.
१६ ते १९ सप्टेंबर दरम्यान आय.सी.आय.एस.एफ., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह (व्हिएतनाम) येथे आयोजित ८ व्या आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन २०२४ परिषदेत प्रबंधाचे मौखिक सादरीकरण होणार आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे २०१६ पासून कारखान्याने हा पॅटर्न सलगपणे राबवला आहे. त्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.
‘लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव-ऊर्जा उद्योग : साखर क्षेत्राचे रूपांतर’ या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला २० साखर उत्पादक देशांतील २५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समकालीन साखर उद्योगाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या या परिषदेला प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ, संशोधक, साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक, धोरणकर्ते आणि प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शुगरकॉन-२०२४ चे आयोजक सचिव जी. पी. राव यांनी सहभागी होण्यासाठी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
...असा आहे दत्त पॅटर्न
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २०१६ पासून उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. एकरी दीडशे टनापर्यंत झेप कारखान्याच्या सभासदांनी घेतली आहे. वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून तो शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांना वेळोवेळी कारखान्याच्या शेती विभागासह अन्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते. माती परीक्षण असं इतर निविष्ठा पुरविण्यात येतात.
कारखान्याचेच नाही, तर देशाचे नाव सातासमुद्रापार
ऊस उत्पादनाच्या दृष्टीने ही सर्वोत्कृष्ट उपलब्धी असल्याचे गणपतराव पाटील यांनी या वेळी सांगितले. हा आमचा तर गौरव आहेच पण भारताचाही गौरव आहे. आमचा पॅटर्न जगात ही वापरण्यात येऊ शकतो. या निमित्ताने भारतात राबवले जाणारे तंत्रज्ञान जगाच्या इतर देशांमध्येही पोहोचेल, असा विश्वास आहे. सध्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, ए. एस. पाटील आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.