Upri Bridge : कासाळ ओढ्यावरील नवीन पुलाचे काम रखडले

Bridge Work : पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी (ता. पंढरपूर) येथील कासाळ ओढ्यावरील पुलाचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. दरम्यान येथील जुना धोकादायक पुलावरून वाहतूक सुरु आहे.
Upri Bridge
Upri Bridge Agrowon
Published on
Updated on

Solapur News : पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी (ता. पंढरपूर) येथील कासाळ ओढ्यावरील पुलाचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. दरम्यान येथील जुना धोकादायक पुलावरून वाहतूक सुरु आहे. येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हसवड ते पंढरपूर या ६० किलोमीटर अंतर रस्त्याचे काम एमएसआरडीच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सुरु आहे. अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

या मार्गावरील बहुतांश पुलांची काम अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर उपरी येथे सर्वात मोठा पूल आहे. पूल उभारणीचे काम सुरु आहे. मागील दोन वर्षापासून पुलाचे काम रडतखडत सुरु आहे.

Upri Bridge
Surya River Bridge : जीवघेणा प्रवास संपता संपेना

पुलाचे काम पूर्ण करावे अशी वारंवार मागणी केली जात आहे. परंतु एमएसआरडीचे अधिकाऱ्यांचे व संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. येथील पुलाचे काम रखडल्याने सध्या जुन्या आणि धोकादायक झालेल्या पुलावरून वाहतूक सुरु आहे. या पुलावरून वाहन चालकांना आपला जीवधोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे.

सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अशा खड्ड्यांमधूनच वाहनचालकांना रस्ता काढावा लागत आहे.

Upri Bridge
Girna River Bridge : बांभोरी निमखेडीदरम्यान पूल, बंधाऱ्याची प्रतीक्षा

येथील जीर्ण झालेला हा पूल कधी ही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करावी अशी मागणीदेखील येथील ग्रामस्थांनी केली आहे. एमआरडीने तातडीने नवीन पुलाचे काम पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला आहे.

एमएसआरडीच्या अधिकाऱ्याची घेणार बैठक

म्हसवड ते पंढरपूरदरम्यानच्या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांची कामे रखडली आहेत. उपरी येथील जुना पूल धोकादायक झाल्याची माहिती मिळाली आहे. येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आषाढी वारीच्या पूर्वी या मार्गावरील प्रलंबित कामांसंदर्भात लवकर एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक घेतली जाईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com