Monsoon Tourist Spots : धोकादायक पावसाळी पर्यटन स्थळे बंद

Monsoon Tourism : मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटांमध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
Monsoon Tourism
Monsoon TourismAgrowon
Published on
Updated on

Pune News : धोकादायक पावसाळी पर्यटनातून होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध पावसाळी पर्यटन केंद्रांवर सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह काही निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी परिपत्रकाद्वारे विविध विभागांना दिले आहेत.

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटांमध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल आदी पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्त्व विभाग व इतर आवश्यक त्या यंत्रणा सोबत उपविभागीय अधिकारी यांनी समक्ष भेटी देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने पाहणी करावी.

Monsoon Tourism
Agriculture Crops : पिकांना जगविण्यासाठी धडपड

धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्याठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरक्षिततेच्यादृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात यावी. तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सूचना फलक लावण्यात यावेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नसलेले संभाव्य आपत्ती प्रवण पर्यटनस्थळे, डोंगराकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करण्यात यावेत आणि अशा ठिकाणी आवश्यक त्या अधिसूचना उपविभागीय दंडाधिकारी यांनी तत्काळ द्याव्यात आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भुशी, पवना लेक, लोणावळा, सिंहगड, माळशेज घाट, ताम्हिणी घाट इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.

Monsoon Tourism
Agriculture Sowing : जळगाव जिल्ह्यात ५४ टक्के पेरण्या

त्या ठिकाणी पर्यटकांसाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ या बाबतचे सूचना फलक लावावेत. महसूल, नगरपालिका, रेल्वे, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीवरक्षक, लाइफ जॅकेट्स, लाइफ ब्वाईज, रेस्क्यू बोटी इत्यादी व्यवस्था तयार ठेवाव्यात. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांनी याबाबत संबंधित विभागांशी समन्वय ठेवून या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

‘वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ नंतर बंदी’

वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर सायंकाळी ६ नंतर बंदी असेल. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळी पर्यटकांना सायंकाळी ६ नंतरदेखील तेथील नियमानुसार प्रवेश असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com