Crop Damage : केळी बागांचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होरपळले

Summer Heat on Crops : खानदेशात केळी बागांना अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalgaon News : खानदेशात केळी बागांना अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट झाली आहे. यात किमान ४० हजार हेक्टर बागांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे तब्बल सुमारे ५०० ते ६०० कोटींचे नुकसान झाले आहे.

खानदेशातील लहान व मोठ्या अशा सर्वच बागांना अति उष्णतेचा फटका बसला आहे. मागील सहा ते सात दिवस कमाल तापमान सतत वाढले आहे. चोपडा, जळगाव, जामनेर भागातील काही मंडलांत ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सर्वत्र मागील चार दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

Crop Damage
Crop Damage : शिरपूर, शहादा तालुक्यांत पिकांचे नुकसान

उष्णतेमुळे लहान व निसवलेल्या, काढणीवर येत असलेल्या बागांत रोज सहा ते आठ तास सिंचन करावे लागत आहे. कारण, बागेत वाफसा, ओलावा कायम ठेवणे आवश्यक आहे. घडांना स्कर्टिंग बॅग किंवा कव्हर लावणे, केळी घडांना केळीच्या वाळलेल्या पानांच्या चुडा करून झाकणे अशी सर्कस शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अति उष्णतेत बागांत घड सटकण्याची समस्याही वाढली आहे. झाडे मोडून पडण्याचे प्रकारही वाढले आहेत.

केळी बागांत उष्णता किंवा उन्हामुळे कोवळी पाने होरपळणे, झाडांना उष्णतेचा फटका बसणे अशा समस्याही दिसल्या आहेत. होरपळलेली झाडे आता उत्पादनक्षम राहिली नाहीत. ती फेकावी लागतील. या होरपळलेल्या झाडांचे १०० टक्के नुकसान झाले आहे.

मागील सात ते आठ दिवसांतील उन्हात बागांचे ३५ टक्के नुकसान खानदेशात झाले आहे. खानदेशात केळी बागांचे किमान ५०० ते ६०० कोटींचे नुकसान झाले असून, हे नुकसान शेतकरी सद्यःस्थितीत भरून काढू शकत नसल्याची स्थिती आहे.

केळीचे दाट क्षेत्र असलेल्या व नैसर्गिक वारा अवरोधक, उष्णतेपासून बचावासंबंधी कार्यवाही केल्या भागातील बागांची स्थिती बरी आहे. सर्वाधिक फटका जळगाव, चोपडा, तळोदा, अक्कलकुवा, जामनेर, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर आदी भागात बसला आहे. हलक्या, मुरमाड क्षेत्रातील केळी बागा व्यवस्थित सिंचन करूनही होरपळल्या आहेत.

Crop Damage
Summer Heat : आंबा, काजू बागांना बसतेय उन्हाची झळ

अनेक उपायही ठरले अपयशी

उष्णतेची लाट व त्यासंबंधी उपाय याबाबत केळी संशोधन केंद्र व अन्य संस्थांनी सूचना दिल्या. तसेच उष्णतेपासून बचावाचे आवाहन केले होते. यानुसार अनेकांनी बागांभोवती पश्चिम व दक्षिणेस हिरव्या नेट बसविल्या. परंतु अति उष्णतेत अनेक उपायही अपयशी ठरले आहेत. सहा ते सात तास पाणी रोज द्यावे लागत असतानाच वीज मध्येच बंद पडते. रोहित्र खराब होत आहेत. यामुळे सिंचनातही अडथळे येत आहेत.

लाखोंचा खर्च वाया : केळीबागांवर एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च निसवणीपर्यंत केला जातो. काही शेतकरी किमान ७० ते ८० हजार रुपये एकरी खर्च करतात. हा खर्चही या नुकसानीमुळे वाया गेल्याची स्थिती अनेक भागात आहे.

तापमान वाढले आहे. चांगली केळीची झाडे सिंचन करून देखील माना टाकत असल्याचे दिसते. सर्वत्र ही समस्या आहे. अशात केळी बागांत बाष्परोधक पूडची फवारणी घ्यावी. यामुळे झाडांतील पाण्याचे प्रमाण राखणे शक्य होईल.
डॉ. चंद्रशेखर पुजारी, प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com