Parbhani Crop Damage : गारपिटीमुळे ५ हजार ९९८ हेक्टरवर पीकहानी

पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार अंतिम बाधित क्षेत्र निश्चित होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Parbhani News : यावर्षीच्या (२०२३) मार्च महिन्यात परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता.१४) ते रविवार (ता.१९) या कालावधीतील अवेळी पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे परभणी, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील ९ हजार १९१ शेतकऱ्यांच्या ५ हजार ९९८.९० हेक्टर वरील जिरायती, बागायती, फळ पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार अंतिम बाधित क्षेत्र निश्चित होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

या महिन्यात मागील वादळी पाऊस, वादळी वारे, गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे सुगीच्या हंगामात परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रब्बी पिके, फळे, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यात जिल्ह्यातील ५ हजार ३१ हेक्टरवरील जिरायती पिके, ६०६ हेक्टरवरील बागायती पिके आणि ६०६ हेक्टरवरील फळपीकांचा समावेश आहे.

Crop Damage
Crop Damage : पुणे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीच्या तक्रारी कराव्यात : डॉ. गोऱ्हे

परभणी तालुक्यातील २ हजार १२९ हेक्टरवरील जिरायती पिके,१४७ हेक्टर बागायती आणि १५३ हेक्टर फळपिकांचे, जिंतूर तालुक्यातील १ हजार ९५० हेक्टरवरील जिरायती पिके, २०५ हेक्टरवरील बागायती पिके, ३१ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले.

सोनपेठ तालुक्यातील ५ हेक्टरवरील फळपिके, गंगाखेड तालुक्यातील ३१० हेक्टरवरील जिरायती पिके, ५८ हेक्टरवरील बागायती आणि १ हेक्टरवरील फळपीकांचे नुकसान झाले.

पालम तालुक्यातील ९० गुंठ्यावरील बागायती पिके आणि ४ हेक्टरवरील फळपीकांचे,पूर्णा तालुक्यातील ६४२ हेक्टरवरील जिरायती पिके,१९६ हेक्टरवरील बागायती पिके आणि १६७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.

बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अंतिम आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर मदत निधीची मागणी केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

Crop Damage
Crop Damage : वादळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट

तालुकानिहाय प्राथमिक अंदाज नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका - बाधित शेतकरी- बाधित क्षेत्र

परभणी- ३२२८ - २४२९

जिंतूर - २८९५- २१८६

सोनपेठ- ७ - ५

गंगाखेड- १८४९ - ३६९

पालम- ७- ४.९

पूर्णा - ११९५- १००५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com