Crop Damage : पुणे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीच्या तक्रारी कराव्यात : डॉ. गोऱ्हे

अधिवेशन काळात राज्यासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune Crop Damage News : अधिवेशन काळात राज्यासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि पंचनामे झालेले नसतील त्यासंबंधीच्या तक्रारी माझ्याकडे संपर्क साधून कराव्यात.

या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून सोडविण्यात येतील, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी दिली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन नुकतेच २६ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत विधान भवन मुंबई येथे पार पडले. त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी (ता. २६) डॉ. गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या, की पुणे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये पाणी, नुकसान भरपाई, शहरातील जुने वाडे, कचरा, वीज अशा अनेक प्रश्नांचा समावेश होता.

Crop Damage
Crop Damage Compensation : २३ गावावर अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ

एकूण १८ दिवस कामकाज सुरू होते. यात १३ विधेयके मंजूर करण्यात आली. अर्थसंकल्प सादर झाला. यात पुरवणी मागण्या सादर झाल्या. अशासकीय ठराव पुरस्थापित झाले. रोजचे सरासरी ६ तासप्रमाणे एकूण १२५ तास कामकाज झाले.

प्रश्न, अल्प सूचना प्रश्न, प्रस्ताव, अर्धातास चर्चा, लक्षवेधी सूचना, २६० अन्वये प्रस्ताव अशा प्रकारच्या पंधरा आयुधांचा वापर करून उपसभापती पदावरून विधान परिषदेच्या प्रभारी सभापती पदाचे नेतृत्व करून सक्षमपणे हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

Crop Damage
Crop Damage : वादळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट

वैधानिक कामासोबतच लक्षणीय अशा स्वरूपाचे काही निर्णय झाले. त्यात प्रामुख्याने रस्ते, पाणी योजना, महिलांना प्रवासासाठी सुविधा, अर्ध्या दरात प्रवासाची सुविधा यासोबतच शाश्वत विकास उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला.

पुण्यातील भिडेवाड्यात स्मारक करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकासही प्रस्तावित आहे.

राज्यातील विविध बारा जिल्ह्यातील तेरा शक्तिपीठे, अष्टविनायक, आदिवासींसाठी रस्ते, पाण्याच्या सुविधा जाहीर झाल्या. वापरावर नियंत्रण, पुनर्वापर या सूत्राचा वापर केल्याचे दिसत आहे.

पुढील महत्त्वाचे मार्गदर्शनपर जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. :

- राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री यांच्याशी समन्वय साधणे, दररोज सर्व पक्षांच्या गटनेत्यांची नियमित बैठक घेणे.

- तालिका सभापतींची नेमणूक करणे.

- परिषदेतील सदस्यांचा कामकाजाबाबत असलेल्या सूचना समजावून घेणे.

- त्यांच्या कामकाजाचा क्रम ठरविणे.

- विधान परिषदेच्या अधिकारी वर्गाला कामकाजाबाबत सूचना देणे.

- त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, सभागृहात ठरलेल्या बैठका घेणे.

- त्यामध्ये योग्य ते निर्देश देणे, सभागृहाचे निर्देश अनुपालनासाठी सर्व आदेशित करणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com