Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage In Kolhapur : करवीर तालुक्यात वादळी पावसाने पिकांचे नुकसान

करवीर तालुक्याच्या पश्‍चिम परिसरात झालेल्या पावसानेवाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे, खुपिरे येथे सुमारे ३२ हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Kolhapur News : करवीर तालुक्याच्या पश्‍चिम परिसरात झालेल्या पावसाने वाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे, खुपिरे येथे सुमारे ३२ हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कृषी सहायक यांच्याकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. वाकरे येथे बारा तास गारा विरगळल्या नसल्याचे चित्र होते.

वाकरे परिसरात सुमारे एक तास गारांचा पाऊस झाला. ऊस पिकाचा पाला गारांनी सोलून काढला. सुमारे १२ तास गारांचा खच विरघळला नव्हता. वाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे, खुपिरे येथे सुमारे ३२ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याच्या सूत्रांनी दिला आहे.

वाकरे येथील सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, यामध्ये भाजीपाला, मका पिकाचा समावेश आहे. कुडित्रे येथे सुमारे आठ हेक्टर तर कोपार्डे येथे सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकाचे गारा पडल्यामुळे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : हिरडा फळाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी येथे सुमारे दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाले. कोपार्डे येथील शेतकरी प्रकाश शिंदे म्हणाले, ‘‘लक्ष्मी टेक परिसरात सुमारे एक तास गारांनी झोडपून काढले. यामध्ये शाळू, ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून मका पीक हातचे गेले आहे.’’

शेतकरी युवराज पाटील म्हणाले, ‘‘गणेश नाळवा परिसरात मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या. त्यामुळे भाजीपाला, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, वाऱ्याचा वेगदेखील वाढला आहे. रविवारी (ता.१६) रात्री उशिरा जिल्ह्याच्या काही भागात विजांचा लखलखाट सुरू होता. परंतु पाऊस पडला नाही.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.७ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. काही भागात गारपीटदेखील झाली. पावसामुळे पूर्वपट्टयातील आंबा हंगामच संकटात सापडला आहे. दरम्यान, १८ एप्रिलपर्यंत अवकाळीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. १६) रात्री उशिरा जिल्ह्याच्या पूर्वपट्टयात विजांचा लखलखाट सुरू होता. वारादेखील सुटला होता, परंतु पाऊस झाला नाही. दरम्यान, सोमवारी (ता.१७) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तापमानातही प्रचंड वाढ झालेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com