Dam-Affected Hunger Strike: धरणग्रस्तांचे दोन मे रोजी उपोषण

Palasdev Hunger Strike: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धरणग्रस्तांच्या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत, आणि त्या सोडवण्यासाठी पळसदेव येथे २ मे रोजी लाक्षणिक उपोषण सुरू होईल, अशी माहिती समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघराज पाटील यांनी दिली आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Pune News: उजनी धरणाच्या बांधणीमुळे पुर्नवसित झालेल्या धरणग्रस्तांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. पुनर्वसन होऊन चार तपांचा कालावधी उलटला तरी धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे.

महसूल लोकशाही दिनाच्या निमित्ताने पळसदेव (ता. इंदापूर) येथे धरणग्रस्तांची समस्या उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. २ मे) धरणाच्या कोरड्या पात्रात लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघराज पाटील यांनी दिली.

Ujani Dam
Farmers Demands: नवीन कृषिपंप ग्राहकांना सौर सक्तीची अट रद्द करा

इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचा कायम काणाडोळा राहिला आहे. गावांचा विस्तार वाढला आहे. कुटुंबांची संख्या वाढली आहे. मात्र त्यापटीत जागेची समस्या निर्माण झाली आहे. गावठाणांचे पुनर्वसन झाले मात्र पुनर्वसन व वनविभाग यांनी केलेल्या काही चुकांचे परिणाम आजही धरणग्रस्तांना भोगावे लागत आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार असल्याचे मेघराज पाटील यांनी सांगितले.

Ujani Dam
Marathwada Water Issue : मराठवाडा पाणीकपात प्रकरणी पाणी परिषदेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धरणग्रस्तांच्या मागण्या

उजनी धरणामुळे पुनर्वसन झालेल्या गावांना वाढीव गावठाण मिळावे.

वाढीव गावठाणात प्रत्येक धरणग्रस्त कुटुंबातील सदस्यांना ४ गुंठ्याचा भूखंड वाटप करण्यात यावा.

पक्की घरे बांधलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरं कायम करून त्यांची उताऱ्यात नावे नोंदविण्यात यावीत.

पुर्नवसीत गावठाणाची व वन विभागाच्या जागेची हद्द कायम करून ग्रामस्थांचा त्रास कमी करावा.

सार्वजनिक कामांना वनविभागाच्या परवानगीची अट शिथिल करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com