Water Stock : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा अवघा २३ टक्क्यांवर

Water Scarcity : नाशिक जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत यंदा पाणीसाठा २३.८९ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास १६ टक्के पाणीसाठा कमी असल्याची स्थिती आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी राहिल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे काही धरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली, तर काही धरणे यंदा भरू शकली नाहीत. त्यात पाण्याचा वाढता वापर व आता उन्हाचा चटका वाढत असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी पाणीसाठ्यात घट होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत यंदा पाणीसाठा २३.८९ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास १६ टक्के पाणीसाठा कमी असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात बहुतांश धरणाचा पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. तर काहींचा त्यातून कमी आहे. मध्यम प्रकल्प असलेली पुणेगाव, तिसगाव, नाग्यासाक्या ही धरणे जवळपास कोरडी पडली आहेत. ओझरखेड, वाघाड, माणिकपुंज, भोजापूर ही धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. तापमानात झालेली वाढ व बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात सातत्याने घट होत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : वन क्षेत्रातही टँकरने पाणी

गंगापूर धरण समूहाचे मुख्य पाणलोट क्षेत्र त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. त्यामध्ये गंगापूर, कश्यपी, गौतमी, गोदावरी व आळंदी या धरणांचा समावेश आहे. येथेही पाणीसाठा घटल्याने नाशिककरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पालखेड धरण समूहातील पालखेड व ओझरखेड धरणांमध्ये ०.८४ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. वाघाड, ओझरखेड, तिसगाव धरणे कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा तालुका इगतपुरी आहे. धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यातच काही धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला होता. तालुक्यातील दारणा धरणात २३.३३ टक्के, भावली धरणात १२.६२ टक्के पाणीसाठा आहे. वालदेवी धरणात ३९.७२ टक्के साठा आहे. गिरणा धरण समूहात २३.८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणद धरणात सर्वाधिक ६८ टक्के पाणीसाठा आहे. तर चणकापूर, हरणबारी, केळझर, गिरणा या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तर माणिकपुंज, नागासाक्या धरण कोरडे पडले आहे.

Water Scarcity
Water Stock : नायगावच्या तलावात ३५ टक्केच साठा

पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाण्याचा साठाही कमी आहे. हे चित्र असेच सुरू राहिले तर सिंचन, उद्योग दूर आधी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील धरण समूहांपैकी गंगापूर व दारणा धरणसमूहातील पाण्याच्या साठ्यावर थेट पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत असते. त्यामुळे आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा (ता. २२ अखेर/दलघफू)

धरण उपयुक्त साठा २०२३ २०२४ टक्केवारी

गंगापूर ५,६३० २,९५८ २,३४४ ४१.६३

कश्यपी १,८५२ १,०३४ ६१५ ३३.२१

गौतमी गोदावरी १,८६८ ३२३ ५३१ २८.४३

आळंदी ८१६ २५३ १४५ १७.७७

पालखेड ६५३ २३७ २२० ३३.६९

करंजवण ५,६७१ १,५३१ ८३१ १५.४७

वाघाड २,३०२ ३४२ १३८ ५.९९

ओझरखेड २,१३० ६७८ २३ १.०८

पुणेगाव ६२३ १३८ ० ०

तिसगाव ४५५ ८१ ४ ०.८४

दारणा ७,१४९ ४,६७३ १,६६८ २३.३३

भावली १,४३४ ५८५ १८१ १२.६२

मुकणे ७,२३९ ४,०८९ २,०६३ २८.६४

वालदेवी १,१३३ ५५४ ४५० ३९.७२

कडवा १,६८८ ४८० २८६ १६.९४

भोजापूर ३६१ ८३ १३ ३.६०

चणकापूर २,४२७ १,२९२ ४६३ १९.०८

हरणबारी १,१६६ ६१२ ४३५ ३७.३१

केळझर ५७२ २३१ ९४ १६.४३

नागासाक्या ३९७ ४० ० ०

गिरणा १८,५०० ५,४३३ ४,१९१ २२.६५

पुनद १,३०६ १,०२३ ८९१ ६८.२२

माणिकपुंज ३३५ ० २० ५.९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com