Anil Kavde : ग्राहक भांडारांनी गरजा,अपेक्षा पूर्ण कराव्यात : कवडे

Anil Kavde : स्पर्धात्मक युगामध्ये ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करताना सहकारी ग्राहक भांडार यांनी दर्जा आणि सेवा देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्यास त्यांचे अस्तित्व टिकून राहील,’’ असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
Anil Kavde
Anil KavdeAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘स्पर्धात्मक युगामध्ये ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करताना सहकारी ग्राहक भांडार यांनी दर्जा आणि सेवा देण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावल्यास त्यांचे अस्तित्व टिकून राहील,’’ असे प्रतिपादन राज्याचे साखर आयुक्त अनिल कवडे यांनी शनिवारी (ता.१०) केले.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील सहकारी ग्राहक भांडारासाठीच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कवडे बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या विजयमाला कदम, सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे उपस्थित होते.

Anil Kavde
Delhi Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलन चिघळले

श्री. कवडे म्हणाले, की राज्यात रोज दोन लाख वीस हजारांपेक्षा जास्त सहकारी संस्था असून एकूण ५४ प्रकारच्या सहकारी संस्था राज्यात कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार गृहरचना संस्था आहेत, तर राज्यातील सुमारे साडेपाच ते सहा कोटी लाख लोक सहकाराशी जोडलेले आहेत.

Anil Kavde
MSP Law : ‘एमएसपी’ कायद्याचा निर्णय घाईत अशक्य : कृषिमंत्री मुंडा

या सर्व लोकांना विविध पद्धतीने दर्जात्मक सेवा देणे आवश्यक असून तरच व्यक्ती सहकाराशी जुळलेल्या राहतील. राज्यातील सहकारी ग्राहक संस्थांशी संबंधित कार्यशाळेमुळे ग्राहक संस्थांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबाबत कसे कार्य करावे याबाबत मार्गदर्शन मिळेलच, परंतु सहकारी ग्राहक संस्थांच्या अडीअडचणी शासनाकडे मांडण्यास यामुळे मदत होणार आहे.

डॉ. विश्वजित कदम, विजयमाला कदम यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे उपाध्यक्ष डॉ. बी. एन. पवार यांनी केले, तर अध्यक्ष डॉ. मंदाकिनी पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com