Aslam Abdul Shanedivan
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड खाल्ले किंवा याचा ज्यूस करून पिले जाते
पण कलिंगडपासून जॅम, टॉफी आणि बार बनवता येतो हे माहित आहे का?
तर कलिंगडपासून जॅम, टॉफी आणि बार बनवण्यासाठी १ किलो कलिंगडचा गर, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड ८ ग्रॅम लागते
आधी कलिंगड कापून बी वेगळे करावीत. यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. या मिश्रणात साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड ८ ग्रॅम घालून ते मंद अग्नीवर गरम करावे
हे मिश्रण ६८.५ टक्के (टीएसएस) गरम झाल्यावर याचे जॅम तयार होते. हे नंतर जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंतुक काचेच्या बर्नीत ठेवावा.
कलिंगडचा बार तयार करण्यासाठी वरिल प्रमाणे कृती करावी. यात साखरेचे प्रमाण ५०० ग्रॅम आणि पेक्टिन ०.५८ ग्रॅम, सायट्रिक आम्ल ३० ग्रॅम, खाद्यरंग १० टक्के व पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइट ३०० पीपीएम वापरावे
हे मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून ते ताटावर तूप लावून टाकावे. थंड झाल्यानंतर त्याचा वड्या कराव्यात.