Agriculture Cultivation : पश्‍चिम विदर्भात मूग, उडीद लागवड घटली

Moong Urad Production : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत या हंगामात यावर्षीही मूग, उडिदाची लागवड घटली आहे.
Mung and Urad
Mung and UradAgrowon
Published on
Updated on

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत या हंगामात यावर्षीही मूग, उडिदाची लागवड घटली आहे. लागवड घटीसाठी प्रामुख्याने असमतोल पाऊस हे कारण सांगितले जात आहे. कधीकाळी मूग, उडिदाच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र चिंताजनक घटले आहे.

अकोला जिल्ह्याचे मुगाचे सरासरी लागवड क्षेत्र साडेसतरा हजार हेक्टर एवढे आहे. तर उडीद पिकाचे साडेअकरा हजार हेक्टर आहे. यापैकी अकोल्यात आतापर्यंत मुगाची अवघी ६०० हेक्टर, तर उडिदाची ६५५ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे मूग व उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत आहे.

Mung and Urad
Moong Urad Sowing : अनिश्‍चित पाऊसमानामुळे मूग-उडदाचे क्षेत्र घटले

यात यंदा मुगाची ६,६०० हेक्टर, तर उडिदाची ७,००० हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली. वाशीममध्येही या दोन्ही पिकांच्या लागवडीची स्थिती फारशी समाधानकारक नाही. या जिल्ह्यात मुगाची सरासरी ७,८९७ हेक्टरच्या तुलनेत १,१०० आणि उडिदाची १०,५०० हेक्टरच्या तुलनेत १,५६० हेक्टरवर पेरणी झाली.

पश्‍चिम विदर्भातील हे जिल्हे कधीकाळी मूग, उडीद उत्पादनात अग्रेसर होते. मागील काही वर्षांत असमतोल स्वरूपाचा पाऊस वाढलेला आहे. पेरणीच्या वेळी उशिरा पाऊस येतो. शिवाय पीक काढणीच्या स्थितीत होणाऱ्या अतिपावसामुळे पिकांचे सातत्याने नुकसान होत असल्याचा पूर्वानुभव लक्षात घेत शेतकरी आता या पिकांच्या लागवडीकडेच पाठ फिरवू लागले.

Mung and Urad
Banana Market : खानदेशात केळी आवक स्थिर

परिणामी कमी कालावधीत येणाऱ्या या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात घट होण्याचे प्रमाण दर वर्षी वाढतच चालले आहे. यंदाची स्थिती सर्वाधिक खालावलेली दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात कोरडवाहू पट्ट्यात मूग, उडिदाची लागवड घटल्याचे समोर आलेले आहे.

राज्यातही यंदा लागवड कमीच

राज्यातील मूग, उडीद लागवडीचा आढावा घेतला असता यंदा मूग लागवड क्षेत्र सरासरीच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे. ३ लाख ९३,९५७ हेक्टरच्या तुलनेत १ लाख ९४,८२७ हेक्टरवर म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली. तर, उडिदाची ३ लाख ७० हजार २५२ हेक्टरच्या तुलनेत २ लाख ९२ हजार १३४ हेक्टरवर म्हणजेच ७९ टक्के पेरणी झाली. मूग, उडीद पीक लागवडीचा कालावधी आता संपला असल्याने फारसे क्षेत्र वाढण्याची शक्यता राहिलेली नाही.

जिल्हा मूग क्षेत्र व टक्के उडीद क्षेत्र व टक्के

बुलडाणा ६,५९४ (३२) ६,९०४ (३०)

अकोला ५९९ (३ ) ६५५ (६)

वाशीम १,०९१ (१४ ) १,५६४ (२४)

राज्य १,९४,८२७ (४९) २,९२,१३४ (७९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com