Agriculture Cultivation : चाऱ्यासाठी मका, ज्वारी लागवड

Fodder Production : हिरव्या चाऱ्यासाठी मका, ज्वारी या पिकांची लागवड करावी.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या चारा पिके संशोधन प्रकल्प व गवत संशोधन योजनेअंतर्गत चारा व गवत पिकांच्या सुधारित जातींची निर्मिती केली आहे.
Fodder Cultivation
Fodder CultivationAgrowon

Fodder Farming : जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे. हा चारा चवदार व पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावराचे शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते. तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देऊनसुद्धा उत्पादनक्षम वय आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दर्जेदार हिरव्या चारा अभावी कमजोर वासरे जन्मतात. आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाणे जास्त काळ राहिल्यास पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.

Fodder Cultivation
Agriculture Cultivation : कापूस, तूर लागवडीसाठी एकात्मिक पीक पद्धत वापरा : डॉ. पवार

मका

जलद वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे. उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

लागवडीसाठी जमीन सुपीक, कसदार व निचरायुक्त निवडावी. एक नांगरट व कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.

आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी. हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी.

Fodder Cultivation
Fodder Production : कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती

जून-जुलै महिन्यात पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो

स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्यावेळी आणि उर्वरित ५० किलो नत्राचा

दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.

पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

ज्वारी

चाऱ्याकरिता विकसित केलेल्या जाती ३ ते ४ मीटर उंच वाढतात. ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात.

मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

जून-जुलै महिन्यात पेरणी करावी. फुले गोधन, रुचिरा, फुले अमृता या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी खोडमाशी नियंत्रणासाठी प्रति किलो बियाणास थायामेथोक्झाम २ ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.

हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) असताना कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ५५० क्विंटल उत्पादन मिळते.

डॉ. संदीप लांडगे,८८३०५१२१३२, डॉ. शिवाजी दमामे ८२०८८०१०५९

(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प , महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com