
Jalagaon News : खानदेशात कांदेबाग केळी लागवड पूर्ण झाली आहे. यंदा लागवड सुमारे १० हजार हेक्टरने वाढली आहे. मजूरटंचाई व नैसर्गिक समस्यांना तोंड देवून शेतकऱ्यांनी लागवड यशस्वी केली आहे.
सध्या उशिराच्या कांदेबाग केळीची लागवड सुरू आहे. यंदा खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर कांदेबाग बहरातील केळी बागांची लागवड झाली आहे. ही लागवड सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या मध्यात सुरू झाली. बाजारातील दर, कंद, रोपे उपलब्धता व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवडी करीत होते.
खानदेशातील तापमान सध्या कमी आहे. पण उकाडा, उष्णता आहे. मध्येच पावसाचे संकेत विविध संस्था देत आहेत. सध्या उशिराच्या बागांची लागवड सुरू आहे. लागवडीसाठी केळी रोपे व कंदांचाही उपयोग वाढला आहे.
सध्या हलका पाऊस, ढगाळ वातावरण आदी समस्या खानदेशात सुरूच आहे. अशात रोहित्रांतील बिघाड, वीज बंद होणे आदी समस्याही तयार होत असून, यावर ट्रॅक्टरचलित जनित्राचा पर्यायही शेतकऱ्यांनी शोधला आहे
जामनेरची आघाडी
खानदेशात कांदेबाग बहरातील केळी लागवडीसाठी जळगावातील जामनेर, चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, भडगाव, नंदुरबारातील तळोदा व अक्कलकुवा हा भाग अग्रेसर आहे. अन्य भागातही कमी क्षेत्रात या कांदेबाग बहर केळीची लागवड केली जाते. यंदाची लागवड सुमारे १० हजार हेक्टरने वाढली आहे.
शेतकरी काटेकोर व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांदेबागांची सर्वाधिक लागवड चोपडा भागात झाली आहे. ही लागवड सुमारे १० हजार हेक्टरवर झाली आहे. यापाठोपाठ यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव, जळगाव आदी भागात लागवड आहे. नंदुरबारातील तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातही लागवड मागील तीन वर्षे सतत वाढली आहे.
कंद दर स्थिर
केळी लागवडीसाठी कंद मुबलक असल्याने त्यांचे दर स्थिर राहीले. तसेच अनेक कंपन्या रोपांचाही पुरवठा करीत आहेत. १० ते १७ रुपये प्रतिरोप, असे केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे दर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात व अन्य जिल्ह्यांतील कंपन्याही रोपांचा पुरवठा करीत आहेत.
तसेच कंदांचे दरही वेगवेगळे आहेत. कंदांमध्ये ग्रॅण्ड नैन वाणाच्या कंदांना अनेकांनी लागवडीसाठी पसंती दिल्याची माहिती मिळाली. कंद दर तीन ते चार रुपये असे आहेत. काही भागात अडीच रुपये प्रतिकंद असे दरही आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.