Agriculture Education : कृषी शिक्षणातील दीपस्तंभ CSMSS कृषी महाविद्यालय

Agriculture College Maharashtra : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ऐतिहासिक,  औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये  कृषी शिक्षणाची भर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने आपल्या कृषी महाविद्यालयाद्वारे घातली आहे.
Agriculture Education
Agriculture EducationAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्याच्या ऐतिहासिक,  औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये  कृषी शिक्षणाची भर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने आपल्या कृषी महाविद्यालयाद्वारे घातली आहे. हे २०१४ पासून ‘अ’ दर्जा टिकवून ठेवणारे मराठवाड्यातील एकमेव कृषी महाविद्यालय आहे.

संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांच्या प्रेरणेतून २००६ मध्ये व्यावसायिक शिक्षणातून शिक्षित, कुशल, मनुष्यबळ निर्मिती, पारंपरिक शेतीला आधुनिक पद्धतीची जोड, ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्धता व स्टार्टअप या उदात्त हेतूने कृषी महाविद्यालयाची सुरुवात झाली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न या कृषी महाविद्यालयात बी. एस्सी (ऑनर्स) कृषी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. कृषी संशोधनासाठी सुमारे ४१ हेक्टर प्रक्षेत्र आणि आधुनिक प्रयोगशाळा आहेत. वातानुकूलित ग्रंथालयामध्ये १० हजारापेक्षा जास्त पुस्तके आहेत. महाविद्यालयातील सोईसुविधांसह उच्च विभूषित विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापक वृंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख चढताच राहिला आहे.

सुसज्ज रुग्णालय, पोस्ट ऑफिस, ए.टी.एम. तसेच २४ × ७ सुरक्षा व्यवस्था, मुलामुलींचे स्वतंत्र अद्ययावत वसतिगृह, अत्याधुनिक व्यायाम शाळा उपलब्ध आहेत. मैदानी खेळासाठी नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुल असून, विविध खेळांचे प्रशिक्षण नियमित दिले जाते. त्यामुळेच महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘अश्‍वमेध’ आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रामुख्याने चमकतात.

Agriculture Education
Agriculture Education : कृषी शिक्षणात मुलींचा बोलबाला ; गुणवत्तेतही सरशी

शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान

महाविद्यालयात कृषी प्रदर्शन, शैक्षणिक सहली, कृषी परिषद, माती परीक्षण, कीड व्यवस्थापन शिबिर, व शेतीदिन मेळावे आयोजित केली जातात. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही या संस्थेचा थेट फायदा होतो. विद्यार्थी ही गावोगावी जाऊन कृषी विस्तार कार्य, जैविक शेतीचे प्रशिक्षण व नवकल्पनांची माहिती देतात.

विद्यार्थ्यांच्या यशोगाथा

महाविद्यालयात स्वतंत्र रोजगार आणि स्पर्धा परीक्षा मंच कार्यरत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, बँकिंग, पदवीधर प्रवेश अभ्यासक्रम, आधुनिक शेती, व औद्योगिक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या रोजगारांच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जातात.

Agriculture Education
Agriculture Education: कृषी तंत्र पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

CSMSS कृषी महाविदयालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाते. याकरिता जिल्हा कौशल्य विकास तथा रोजगार निर्मिती विभागांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना बियाणे उद्योग, उतिसंवर्धन, जैवतंत्रज्ञान, या विषयाचे अद्ययावत प्रशिक्षण मिळावे याकरिता देशातील नावाजलेली बियाणे कंपनी अजित सीट्‌स प्रा.लि. यांच्या समवेत सामंजस्य करार केला आहे. रोजगार निर्मिती विभागाद्वारे विविध नामांकित कंपन्यांना आमंत्रित केले जाते.

पुरस्कार व प्रोत्साहन

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारची बक्षिसे देते. त्यात कृषी शास्त्रज्ञ स्व. डॉ. मधुकरराव ठोंबरे मेरीटोरियस अवॉर्ड,

श्रीमती कौशल्याबाई शेळके स्मृतिप्रीत्यर्थ

मेरीटोरियस अॅवॉर्ड, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार व स्पर्धा परीक्षा मार्फत निवड झालेले विद्यार्थी आणि नव उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते.

संशोधनाची नवी दिशा

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या पुढाकारातून संशोधन क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी सी. एस. एम. एस. एस. जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड अप्लाईड सायन्स (CSMSS Journal of Agriculture and Applied Science) या नावाने एक संशोधन जर्नल सुरू करण्यात आले आहे. हे जर्नल विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपर्यंत सर्व संशोधकांसाठी एक खुले व्यासपीठ आहे. ज्यामधून शेती व लागवड तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि पर्यावरणीय विज्ञान यावर आधारित पिअर रिव्ह्यू (Peer reviewed) लेख प्रकाशित केले जातात.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांचे मार्गदर्शन आणि ३५ वर्ष कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण, संशोधन, आणि विस्तार क्षेत्राचा अनुभव असणारे कृषी महाविद्यालयाचे संचालक प्रा. (डॉ.) जगदीश जहागीरदार, प्राचार्य डॉ. प्रवीण बैनाडे यांचे मार्गदर्शन कृषी महाविद्यालयास लाभले आहे. त्यामुळे कृषी शिक्षण आणि शाश्‍वत शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उपक्रमांची दखल घेत ‘ॲग्रीकेयर अॅवॉर्ड – २०२३’ च्या माध्यमातून ‘बेस्ट ॲग्रिकल्चर कॉलेज’ हा मानाचा सन्मान कृषी महाविद्यालयाला मिळाला आहे.

आमचे CSMSS कृषी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना केवळ पदवीच देत नाही तर त्यांच्यात शाश्‍वत शेतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, आणि आत्मनिर्भरता निर्माण करते. आधुनिक तंत्रज्ञान, पारंपरिक ज्ञान, व मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून हे महाविद्यालय शेतीच्या नव्या युगाचे नेतृत्व करीत आहे.
- पद्माकर मुळे सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर
CSMSS कृषी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रम, संशोधन संधी आणि करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शेती, पशुपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी अर्थशास्त्र आणि कृषी विस्तार यांसारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षण दिले जाते. सोबतच संशोधन, विकास आणि ग्रामीण भागाच्या विकासात सक्रिय भूमिका घेण्याची संधीही देते.
- समीर मुळे विश्‍वस्त, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com