Sugarcane Season : पिंपळनेरच्या शिंदे कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

Sugar Production : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर या कारखान्याचे या हंगामात आज अखेर ११ लाख १६ हजार ८१८ मेट्रीकटन उसाचे गाळप होऊन १०.८४ टक्के साखर उताऱ्याने-याने ७ लाख १० हजार ८०० क्विंटल साखर पोती उत्पादित झाली आहेत.
Sugar Factory
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Solapur News : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर या कारखान्याच्या सन २०२४-२५ या हंगामाची सांगता, कारखान्याने उत्पादित केलेल्या ७ लाख ९ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजनाने नुकतीच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांचे हस्ते झाली.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर या कारखान्याचे या हंगामात आज अखेर ११ लाख १६ हजार ८१८ मेट्रीकटन उसाचे गाळप होऊन १०.८४ टक्के साखर उताऱ्याने-याने ७ लाख १० हजार ८०० क्विंटल साखर पोती उत्पादित झाली आहेत.

तसेच युनिट नंबर २ कडे ३ लाख ७५ हजार ७३८ मेट्रीकटन उसाचे गाळप होऊन १०.९५ टक्के साखर उताऱ्याने-याने ३ लाख ५६ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून १४ लाख ९२ हजार ५५६ मेट्रीकटन गाळप होऊन १० लाख ६७ हजार ३०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.

Sugar Factory
Sugarcane Season : देशातील ७७ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

या हंगामामध्ये युनिट नंबर १ चे डिस्टिलरी विभागाकडे शुगर सिरप पासून २ कोटी २१ लाख बल्क लिटर इथेनॉल व २ कोटी ७१ लाख ४७ हजार स्पिरीट उत्पादन झाले आहे. या हंगामासाठी उसाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने हंगाम लवकर बंद झाला.

यावर्षी सर्वच कारखान्यांना उसाची कमतरता भासली.त्यामुळे साखर कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. केंद्र शासनाने साखर निर्यातीला नुकतीच परवानगी दिल्याने साखर कारखान्यांना कांही अंशी दिलासा मिळणार असल्याचे अध्यक्ष, माजी आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Sugar Factory
Sugarcane Season : उत्तर सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे, संचालक लक्ष्मण खुपसे,शिवाजी डोके,रमेश येवले- पाटील,वेताळ जाधव,लाला मोरे, पांडुरंग घाडगे,तज्ञ संचालक भारत चंदनकर, कार्यकारी संचालक एस.एन दिग्रजे एस.आर.यादव व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

पंधरा दिवसांच्या पगाराचे बक्षीस

साखर कारखान्याचा गळीत हंगाम सभासद, ऊस पुरवठादार, ऊसतोडणी मजूर, वाहनमालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाला असल्याने दोन्ही युनिटकडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचा पगाराइतकी रक्कम बक्षिस म्हणून अदा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com