

Latur News : लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. त्यावर निधीही खर्च झाला. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या योजनांचे पाणी गेले कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे.
उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती ९८ गावे व सहा वाडी-तांडे अशी १०४ गावांची संख्या आहे. जवळपास सर्वच गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. यातील बहुतांशी गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असून, काही गावांची कामे लवकर सुरू होणार आहेत. असे असले तरी यावर्षी पाऊस कमी असल्याने पाणीपुरवठा योजनांचे स्रोत ज्या ठिकाणी आहेत तेथेच पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे तगडे आव्हान असणार आहे.
उदगीर तालुक्यातील १०६ गावांना टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील बारूळ येथील प्रकल्पातून वॉटर ग्रीड योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम सुद्धा सुरू झाले आहे. ज्यावेळी या भागातील स्रोत आटले जातील त्यावेळी या प्रकल्पातून उदगीर तालुक्यातील १०६ गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सव्वा कोटीचा टंचाई आराखडा
येथील पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीसाठी एक कोटी २७ लाख रुपयाचा टंचाई आराखडा प्रस्तावित केला आहे; यामध्ये ३८ गावे अधिग्रहण तर २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि १४ वाड्या, तांड्यांना पाणी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी दिली आहे.
जल जीवन पाणीपुरवठा योजनेची स्थिती एकूण मंजूर गावे १०६ काम पूर्ण झालेल्या गावांची संख्या २५ काम सुरू न झालेल्या गावांची संख्या ५ काम प्रगतीपथावर असलेल्या गावांची संख्या ६८ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे असलेल्या गावांची संख्या ८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.