Crop Insurance : साडेसात लाख हेक्टरवरील पिके संरक्षित

Kharif Season : यवतमाळ जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९४४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६ लाख ५६ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९४४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६ लाख ५६ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे. बुधवारी (ता. ३१ जुलै) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत होती. उर्वरित दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र विमा संरक्षणाविनाच राहणार आहे. मागील वर्षी आठ लाख ४४ हजार ७४६ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता.

दर वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तर पीकविमा काढल्यानंतरही अनेकांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होते. तरीसुद्धा शेतकऱ्यांना पीकविमा काढावा यासाठी शासन आणि प्रशासन आग्रही असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना काढली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमाप्रश्‍नी विमा कंपनी, शासनाला न्यायालयाची नोटीस

त्या अनुषंगाने यंदा १५ जूनपासून विमा उतरविण्यास सुरुवात झाली होती. मॉन्सूनने मारलेल्या दांडीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या होत्या. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस कोसळल्याची नोंद आहे.

सुरुवातीला विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा नगण्य होती. त्यानंतर शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंत जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९४४ शेतकऱ्यांनी ६ लाख ६५ हजार हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा काढला आहे. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा काढता येणार होता. त्यामुळे पीकविम्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने वर्तविण्यात आली होती.

Crop Insurance
Crop Insurance : साडेसहा लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा

गत वर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्र घटले

अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, गारपिटीसह इतरही कारणामुळे शेतीपिकांचे नुकसान होते. दर वर्षी शेतकऱ्यांना अशा नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली. या योजनेतून मागील वर्षी आठ लाख ४४ हजार ७६४ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्या तुलनेत यंदा विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा बसला फटका

राज्य सरकारने १ जुलैपासून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना चालू केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्यांची सुरुवातीला सेतू केंद्रावर एकच गर्दी केली होती. या प्रकारामुळे पीकविमा काढण्यास शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. शेवटी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com