Water Shortage : ‘आरफळ’च्या लाभक्षेत्रातील पिके कोमेजली

Water Demand : विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. आरफळ उपसा सिंयन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव तालुक्यांना दिशादर्शक असलेल्या आरफळ योजनेचे आवर्तन लांबले आहे. आळसंद, वाझर, बलवडी, आंधळी, मोराळेसह अन्य गावांतील योजनेच्या लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. आरफळ उपसा सिंयन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दशकापूर्वी आरफळ योजना सुरू झाली. लाभक्षेत्रातील शेतीला मोठा लाभ झाला. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर कष्ट घेतल्याने ऊस, केळी, हळद, भाजीपाला पिके डोलू लागली आर्थिक परिवर्तन होऊ लागले.

Water Shortage
Animal Water Issue : दुष्काळात जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न दुर्लक्षित

उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. साखर कारखान्यांना लाभ झाला. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. आरफळ परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले. परिणामी धरणात पाणीसाठा कमी झाला. उपलब्ध पाणी सोडण्यास राज्यकर्ते आडकाठी आणत आहेत, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

Water Shortage
Chandoli Water Issue : चांदोलीच्या पाण्यासंदर्भात आंदोलनाची दिशा बदलणार

शेतकऱ्यांनी आरफळच्या पाण्याच्या भरवशावर ऊस, भाजीपाला, अन्य पिके घेतली आहेत. आवर्तन लांबल्याने पिके कोमेजून गेलीत. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडावे, अशी मागणी आहे.

आरफळ योजनेच्या पाण्याच्या भरवशावर उसाची लागवड केली आहे. आवर्तन लांबल्याने उसाची लागण वाळून जाण्याचा धोका आहे. योजनेचे पाणी सोडावे.
संजय निकम, बलवडी (भा.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com