Agriculture Electricity : सोलापूर जिल्ह्यात रोहित्राअभावी बागायती पिके धोक्यात

Crop Damage: रोहित्र खराब झाल्यास ठेकेदारांकडून ते बदलण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पैशातून बदलेले जाते. अशा शेतकऱ्यांना पंधरा ते वीस दिवस रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
Farm Condition
Farm ConditionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : रोहित्र खराब झाल्यास ठेकेदारांकडून ते बदलण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पैशातून बदलेले जाते. जे शेतकरी पैसे देऊन रोहित्र बदलून घेत नाहीत, अशा शेतकऱ्यांना पंधरा ते वीस दिवस रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून जनावरांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही.

महावितरणकडून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करताना प्रत्येक दुरुस्तीकामाचा खर्च शेतकऱ्यांवर सोपविला जातो. नव्याने जोडणी देणे असो, की डीपीतील फ्यूज, कटआऊट बदलणे असो, प्रत्येक कामासाठी संबंधित डीपीवरील शेतकऱ्यांना वर्गणी जमा करणे भाग पडत आहे.

Farm Condition
Kolhapur Sugarcane Frp : कोल्हापूर जिल्ह्यात उसाची पेटवापेटवी, शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

नुकतेच वाळूज (ता. मोहोळ) येथील मानेगाव रस्त्यावरील डीपीचे रोहित्र जळून आठवडा उलटला तरीही नवे रोहित्र न बसविल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या डीपीवर सुमारे दहा शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या आहेत. कांदा, ऊस, ज्वारी, मका, हरभरा, गहू या पिकांचे विजेअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Farm Condition
Raju Shetti : संघर्ष ऊसदराचा! तोडगा न निघाल्यास राजू शेट्टी महामार्ग रोखणार

त्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

ज्या शेतकऱ्यांची रीतसर वीजजोडणी आहे, त्यांनाच वीजपुरवठा केला जात नाही. सतत कमी दाबाने पुरवठा वेळोवेळी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. मागील अनेक दिवसांपासून रोहित्र खराब झालेले असताना ठेकेदार आणि महावितरणचे अधिकारी यांच्याकडून चालढकल होत आहे.
प्रकाश कादे, शेतकरी, वाळूज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com