Unseasonal Rain : मराठवाड्यात नुकसान आठ हजार हेक्टरवर

Crop Damage : मराठवाड्यात प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, नुकसानीचे क्षेत्र आता ८ हजार हेक्टरवर पोहोचले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, नुकसानीचे क्षेत्र आता ८ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. पावसाचा जोरही कायम असल्याने नुकसानीचे क्षेत्र सातत्याने वाढतच आहे.

मराठवाड्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पावसाने आपले आक्रमण सुरू केले आहे. ते थांबण्याचे नाव घेत नसून कमी अधिक प्रमाणात दररोज विविध भागांमध्ये वादळ, पावसाची हजेरी व त्यामुळे नुकसान होण्याचे सत्र सुरूच आहे.

आतापर्यंत जवळपास ८००८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने दिला आहे. त्यामध्ये १२५५ हेक्टर जिरायती, ३४१६ हेक्टर बागायती तर ३३३५ हेक्टर फळबांगाच्या नुकसानीचा समावेश आहे.

Crop Damage
Unseasonal rain : राज्याला चांदा ते बांदा अवकाळीने झोडपले; शेतकरी हवालदील

८५३ गावांतील पिकांचे नुकसान

मराठवाड्यात पिकांचे ८५३ गावांत नुकसान झाले आहे. त्यामध्ये धाराशिवमधील २८४, लातूरमधील १८७, बीडमधील १३८, नांदेडमधील ४२, हिंगोलीतील २४, परभणीतील ३९, जालन्यातील १२७ तर छत्रपती संभाजीनगरमधील १२ गावांचा समावेश आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : अक्कलकोटसह सोलापुरात अवकाळीचा तडाखा

६०३ घरे, ५३ गोठ्यांचे नुकसान

मराठवाड्यातील ६०३ घरांचे तसेच ५३ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पूर्णतः पडझड झालेल्या घरांची संख्या १८ आहे. १० अंशतः पडझड झालेली घरे आहेत. तर एक झोपडी व ५३ गोठे पूर्णपणे नष्ट झाले आहेत.

१७ व्यक्ती, २८० जनावरे मृत्यूमुखी

मराठवाड्यात नऊ एप्रिलपासून २९१ गावांतील १७ व्यक्ती व २८० जनावरांचे प्राण नैसर्गिक आपत्तीत गेले आहेत. मयत झालेल्या व्यक्तींमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४, परभणीतील २, हिंगोलीतील एक, नांदेड व बीडमधील प्रत्येकी ३, तसेच लातूरमधील ४ व्यक्तींचा समावेश आहे. दुसरीकडे ३२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

त्यामध्ये सर्वाधिक १८ व्यक्ती बीडमधील त्यापाठोपाठ धाराशिवमधील ४, लातूरमधील ३, नांदेडमधील ६ व छत्रपती संभाजीनगरमधील एका व्यक्तीच्या समावेश आहे. मृत्यू पावलेल्या २८० जनावरांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ११, जालन्यातील ७०, परभणीतील १३, हिंगोलीतील १३ , नांदेडमधील ३४, बीडमधील ३३, लातूरमधील ४२ व धाराशिवमधील ६४ जनावरांचा समावेश आहे. त्यात २२० लहान व मोठ्या दुधाळ जनावरांचाही समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com